मौलानाने 14 वर्षांच्या मुलीवर 4 महिने केला बलात्कार

0

कानपूर,दि.14: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका मौलानाने एका अल्पवयीन मुलीला फूस लावून चार महिने तिच्यावर बलात्कार केला. मुलगी गरोदर राहिल्यानंतर आरोपीने तिला गर्भपाताची औषधे दिली. त्यामुळे मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी तक्रारीच्या आधारे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण कानपूरच्या नौबस्ता पोलीस स्टेशन परिसरातील आहे. येथे एक गरीब कुटुंब मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होता. घरासमोर राहणारा सोनू हाफिज हा परिसरातील एका मशिदीत मौलाना आहे.

सोनू 14 वर्षांच्या मुलीला खाण्यापिण्याचे आमिष दाखवून बराच वेळ आपल्या घरी बोलावत असे. यादरम्यान तो तरुणीवर बलात्कार करायचा. याचा विरोध केला असता आरोपीने संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली.

दरम्यान, मुलगी गरोदर राहिल्याने तिची प्रकृती ढासळू लागली. असा आरोप आहे की, गरोदर राहिल्यानंतर सोनूने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या, त्यामुळे तिची तब्येत आणखी खालावली. पीडित मुलीच्या आईने सांगितले की, ईदच्या दिवशी तिची तब्येत बिघडल्याने मुलगी घाबरलेली दिसत होती. तिला विचारले असता तिने आपली कहाणी सांगितली.

मुलीची गंभीर स्थिती पाहून कुटुंबीयांनी मुलीला परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल केले, तेथे तपासणी केली असता मुलगी तीन महिन्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. ती गरोदर असल्याचे समजताच तिच्या कुटुंबीयांना धक्काच बसला. त्यांनी या प्रकरणाची माहिती नौबस्ता पोलिसांना दिली.

कानपूरचे डीसीपी दक्षिण रवींद्र कुमार यांनी सांगितले की, आरोपीविरुद्ध बलात्कार, पॉक्सो कायदा, जीवे मारण्याची धमकी देणे आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. इतर कायदेशीर कारवाई सुरू आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here