अंतरवाली सराटी,दि.3: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे राज्यातील विधानसभा निवडणुकीत एकच रंगत येण्याची शक्यता आहे. जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यापूर्वीच काही मतदारसंघांची नावे समोर आली आहेत.
सर्व पक्ष विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहेत. मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मनोज जरांगे यांनी निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. मनोज जरांगे यांनी आपण कोणत्या मतदारसंघातून लढणार आहोत हे जाहीर केलं आहे. तसंच जिथे उमेदवार द्यायचा नाही त्या मतदारसंघात उमेदवार पाडला जाणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
मराठवाड्यातील कोणत्या मतदारसंघात जरांगे उमेदवार देणार आहेत याची माहिती समोर आली आहे. काही मतदारसंघांची नावे समोर आल्याने या मतदारसंघातील प्रस्थापित उमेदवारांच्या काळजात धस्स झालं आहे. सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर दक्षिण मतदारसंघात व बार्शी विधानसभा मतदारसंघात उमेदवार न देता पाठिंबा देण्याची शक्यता आहे.
बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघातून आपण लढणार असल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केलं आहे. आष्टी, गेवराई मतदारसंघातून लढायचं की नाही यावर चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली आहे. तसंच मंठा परतूर मतदारसंघातून उमेदवार देत तेथूनही लढणार आहेत. ZEE24 तासने याबाबत वृत्त दिले आहे.
जालना जिल्ह्यातून केवळ एकाच मतदारसंघात मनोज जरांगे लढणार आहेत. परतूर-मंठा मतदारसंघातून उमेदवार देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. याशिवाय संभाजीनगर-फुलंब्री मतदार संघातून लढणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. ज्या मतदारसंघात उमेदवार नाही तिथे उमेदवार पाडणार, खुन्नस आहे तिथे पाडणार असंही ते म्हणाले आहेत.
संभाजीनगर-फुलंब्री मतदार संघातून लढणार
संभाजीनगर: कन्नड मतदार संघातून लढायचं की नाही यावर विचार करून निर्णय घेणार
संभाजीनगर: गंगापूर मतदार संघात उमेदवार पाडणार
संभाजीनगर: संभाजीनगर पश्चिम मतदार संघात पाठिंबा देणार
हिंगोली :कळमनुरी मतदार संघात उमेदवार पाडणार
हिंगोली:वसमत मतदार संघातून उमेदवार द्यायचा की नाही यावर विचार करणार
जालना: भोकरदन मतदार संघात उमेदवार पाडणार