Manoj Jarange: आंतरवली सराटी येथे बेमुदत उपोषण केले जाणार: मनोज जरांगे पाटील

0

छत्रपती संभाजीनगर,दि.20: Manoj Jarange: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा बेमुदत उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता मनोज जरांगे यांनी यापूर्वीही उपोषण केले होते. मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथे उपोषण करण्याची 4 जून ही तारीख तीन महिन्यापूर्वीच ठरली आहे, या तारखेत कुठलाही बदल होणार नाही. आंतरवली सराटी येथे बेमुदत उपोषण केले जाणार असल्याचा निर्धार मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला.

मनोज जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान आज सोमवारी प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

काय म्हणाले मनोज जरांगे? | Manoj Jarange

मनोज जरांगे म्हणाले की, तुम्ही कितीही एसआयटी लावा, आरोप करा, गुन्हे दाखल करा. मात्र तुम्हाला मराठा समाजाची खरी एकजूट , ताकद चार जूनच्या उपोषणातून दिसून येईल असा गर्भित इशारा त्यांनी सरकारला दिला.

मराठा-ओबीसी वाद

मी कुठलाही जातिवाद केलेला नाही व मराठा ओबीसी समाजात जातीय तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केलेले नाही, असे असताना ओबीसी नेते मात्र मला जातीयवादी ठरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. असा टोला नाव न घेता मंत्री धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांना लगावला. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण आणि सग्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी हा लढा सुरू आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here