“मराठा ताकदीने एकत्र आला, त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना…” मनोज जरांगे

0

मुंबई,दि.१०: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका पाच टप्प्यात होत आहेत. ७ मेला तिसऱ्या टप्प्याचे मतदान झाले आहे. राज्यात अजून दोन टप्पे बाकी आहेत. तर देशात ७ टप्प्यात निवडणुका होत आहेत. राज्यातील अजून दोन टप्पे बाकी असताना मनोज जरांगे यांनी “एकीची भीती एवढी बसली आहे की, चांगल्या चांगल्यांना गुडघे टेकावे लागत आहेत” असे म्हटले आहे.

महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होत आहेत. मोदी यांनी महाराष्ट्रात विशेष लक्ष दिल्याचे दिसून येत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हेही महाराष्ट्रात दौरे करत आहेत. जरांगे यांनी लोकसभा निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे.

यासंदर्भात एक अल्टिमेटमही मनोज जरांगे यांनी दिले आहे. एकीची भीती एवढी बसली आहे की, चांगल्या चांगल्यांना गुडघे टेकावे लागत आहेत. मराठा ताकदीने एकत्र आला. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला आहे, अशा आशयाचे विधान मनोज जरांगे यांनी केले आहे. शुक्रवारी आष्टीच्या आंभोरा तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या संवाद बैठकीत ते बोलत होते.

भाजपाला आमचा कधीही विरोध नव्हता

मराठा ताकदीने एकत्र आला आहे. देशाने धास्ती घेतली आहे. एकीची भीती एवढी बसली आहे की, चांगल्या चांगल्यांना गुडघे टेकावे लागत आहेत. मराठा एक झाला म्हणून राज्यात अनेक टप्प्यात निवडणूक लागली आहे. दुसरीकडे एक आणि दोन टप्प्यात निवडणुका होत आहे. हाच मराठ्यांचा विजय आहे. भाजपाला आमचा कधीही विरोध नव्हता. पण सरकारने आमच्या मायलेकीची डोकी फोडली. मी कोणालाही निवडून द्या, म्हटलं नाही. मात्र, या निवडणुकीत असे पाडा की पुढच्या पाच पिढ्या घरी बसल्या पाहिजेत. माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास दिला तर पुढच्या दहा पिढ्या मराठे तुमच्या कपाळाला गुलाल लावणार नाहीत. दुसऱ्यासाठी मराठा समाजाच्या विरोधात जाऊ नका. तुम्हाला ही शेवटची संधी आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. 

लोकांचे कपडे घालणारा तू माझ्या…

मी कायदा आणि आचारसंहितेला मानतो. कोल्हापूरचा चंद्रकांत पाटील, तेरे नाम, खेकड्याची औलाद. मी कधी तुझ्या नादी लागलो रे? फडणवीसांनी मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले म्हणून सांगतो. लोकांचे कपडे घालणारा तू माझ्या नादी लागू नको. मराठ्यांच्या जीवावर चंद्रकांत पाटील निवडून येतात. तुला आमदारकीला दाखवतो,कसा निवडून येतो, ते बघतो?, अशा शब्दांत जरांगेंनी चंद्रकांत पाटील यांना आव्हान दिले.

या लोकसभा निवडणुकीत असे पाडा की, पाच पिढ्या घरी बसले पाहिजे. दुसऱ्यासाठी मराठा समाजाच्या विरोधात जाऊ नका, ही शेवटची संधी आहे तुम्हाला. जात महत्वाची आहे. असे मनोज जरांगे म्हणाले. मोदी इथे मुक्कामी आहे. मराठा कुणबी कायदा पारित नाही केला तर विधानसभेला बघतो, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here