अहमदाबाद,दि.22: मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी भाजपावर (BJP) गंभीर आरोप केले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. केजरीवाल यांचा महिनाभरातला हा पाचवा दौरा आहे. यादरम्यान मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी भाजपच्या एका नेत्याने पक्ष फोडण्यासाठी मोठी ऑफर दिल्याचा आरोप केला आहे.
आप पक्षाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की मनीष सिसोदिया यांच्याकडे आम आदमी पक्षात फूट पाडण्याच्या बदल्यात भाजपने दिलेल्या ऑफरचे कॉल रेकॉर्डिंग आहे.
“मला एक संदेश मिळाला. त्याचे दोन भाग होते. एकात भागात म्हणाले की माझ्यावरील सर्व सीबीआय आणि ईडी खटले बंद केले जातील. दुसऱ्या भागात मला ‘आप’ सोडून भाजपमध्ये जाण्यास सांगितले. ते म्हणाले की ते मला मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बनवतील.” कारण दिल्लीत भाजपकडे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार नाही. माझ्यावरील सर्व खटले खोटे आहेत. मी केजरीवाल यांच्यासोबत आहे कारण मी प्रामाणिक आहे. ज्याने मला मेसेज दिला ते म्हणाले की त्यांनी शुभेंदू अधिकारी, हिमंता बिस्वा सरमा आणि जयंत पांडा यांचा भाजपमध्ये करवून आणला आहे. म्हणूनच ते म्हणाले की ते त्याच्यावर विश्वास ठेवू शकतात.”
सिसोदिया म्हणाले, “तुम्ही मला घाबरवू शकत नाही. मी मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहत नाही, जगातील प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण देण्याचे माझे स्वप्न आहे. केवळ केजरीवालच हे वचन पूर्ण करू शकतात.”
अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया यांचे समर्थन करत म्हणाले, “ज्या माणसाने दर्जेदार सरकारी शाळा बांधून चमत्कार दाखवला, त्याच्यावर सीबीआयने छापा टाकला. लाज वाटत नाही का? अशा माणसाला भारतरत्न द्यायला हवा. शिक्षणाच्या मुद्द्यावर त्याचा सल्ला घ्यावा. काय झालं? देशातील प्रत्येकजणअस्वस्थ आहे.”
भाजपशासित गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा मुकाबला करण्यासाठी निवडणूक प्रचारात सिसोदिया यांच्यावरील छापे टाकण्याचा मुद्दा जोरदारपणे मांडण्याची योजना असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.
उत्तर गुजरातच्या त्यांच्या मागील दौऱ्यात, केजरीवाल यांनी गुजरातच्या जनतेला मोफत वीज पुरवठा आणि राज्यातील सुधारित आरोग्य सेवा यासह अनेक आश्वासने दिली आहेत. राज्यात मोफत शिक्षण आणि आपला पक्ष सत्तेवर आल्यास खासगी शाळांचे ऑडिट करण्याचे आश्वासन त्यांनी यापूर्वीच दिले आहे.