सोलापूर,दि,6: मनिष काळजे (Manish Kalje) यांनी सिमावर्ती भागातील गावांनी कर्नाटकमध्ये जाण्याचा निर्णय घेऊ असे आवाहन केले आहे. अक्कलकोट तालुक्यातील सिमावर्ती भागातील गावाचा विकास झाला नाही म्हणून कर्नाटकात जाणार असा ठराव केले आहे, त्या गावांचे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. आपण कर्नाटकात जाण्याचा निर्णय मागे घ्यावा असे बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख मनिष काळजे (Manish Kalje News) म्हणाले.
जनतेच्या भावना तीव्र असल्या तरी त्यांनी संयम बाळगावा: मनिष काळजे
महाराष्ट्र – कर्नाटक सिमावादावर अक्कलकोट तालुक्यातील जनतेच्या भावना तीव्र असल्या तरी त्यांनी संयम बाळगावा, असं आवाहन जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी केलं आहे. अक्कलकोट तालुक्याचा पुर्व, उत्तर, दक्षिण भाग कर्नाटक सीमावर्ती भाग आहे. केवळ अठ्ठावीस गावे नसुन निम्मा अक्कलकोट तालुका सिमावर्ती आहे.
सिमावर्ती गावातील नागरिकांचा कर्नाटकमध्ये जाण्याचा निर्णय
सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा सीमावादाचा प्रश्न पुन्हा उफाळून आला असून, यावरुन आरोप प्रत्यारोपांमुळे वातावरण चांगलचं ढवळून निघालं आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील सीमावर्ती गावांतील नागरिकांनी एकत्रित येत कर्नाटकमध्ये जाण्याचा निर्धार करुन तशा प्रकारचा ठराव केल्यानं सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे.
मनिष काळजे यांनी घेतली पदाधिकाऱ्यांची बैठक
नागरीकांच्या भावना या प्रश्नी अत्यंत तीव्र दिसून येत आहेत. लोकप्रतिनिधींच्या ही या संदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
या पार्श्वभुमीवर जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी अक्कलकोट तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सीमावर्ती भागातील प्रश्न जाणून घेतले. वीज, रस्ते, पाणी याप्रश्नी गावांतील जनतेच्या भावना या निश्चितचं रास्त आहेत. मात्र त्यांनी कर्नाटकात जाण्याचा ठराव करणं योग्य नाही.
गावातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करु: मनिष काळजे
आपण अक्कलकोट तालुक्यातील सिमावर्ती गावच्या जनतेच्या प्रश्नांसाठी तालुकाप्रमुख संजय देशमुख विधानसभा संघटक प्रा. सुर्यकांत कडबगावकर तालुकाउपप्रमुख सैफन पटेल, बसवराज बिराजदार, उमेश पांढरे युवासेना तालुकाप्रमुख समीर शेख, विभागप्रमुख शिवानंद कोळी, सिध्दाराम व्हरपेठी यांच्यासमवेत सिमावर्ती गावाना भेट देऊन त्यांचे प्रश्न जाणुन घेणार आहोत. व लवकरच संपर्क प्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन प्रत्येक गावातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करु अशी ग्वाही जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी दिली.
जनतेला निश्चितचं न्याय मिळवून देऊ: मनिष काळजे
अक्कलकोट तालुक्यातील सिमावर्ती गावांचा, रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. यामुळं जनतेचे मोठे हाल होत आहेत. त्या ठिकाणी रस्ते, शेतीसाठी पाणी व विज हे प्रश्न प्रामुख्याने सोडवणे आवश्यक आहे. संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली सर्वांना एकत्रित घेऊन आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे युध्दपातळीवर प्रयत्न करु. जनतेन या प्रकरणी शांत राहून सहकार्य करावं, असंही आवाहन करत आपण या प्रश्नावर जनतेला निश्चितचं न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही देखील जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी अक्कलकोट तालुक्यातील सिमावर्ती भागातील जनतेला दिली आहे.
यावेळी तालुकाप्रमुख संजय देशमुख विधानसभा संघटक प्रा. सुर्यकांत कडबगावकर, तालुकाउपप्रमुख सैफन पटेल, बसवराज बिराजदार, उमेश पांढरे, कामगार सेना तालुकाप्रमुख स्वामीनाथ हेगडे, दलितसेना तालुकाप्रमुख सुशिलकुमार शिंगे, शिक्षक सेना तालुकाप्रमुख प्रा. इरण्णा धानशट्टी, महिला आघाडी तालुकाप्रमुख वर्षाताई चव्हाण, वाहतुक सेना तालुकाप्रमुख सुनील पुटगे, विभागप्रमुख शिवानंद कोळी, तानाजी मोरे, सिध्दाराम व्हरपेटी, प्रसिद्धीप्रमुख प्रमुख खंडु कलाल, युवासेना तालुकाउपप्रमुख प्रा. बसवराज कोळी, तसेच सिमावर्ती गावांतील शाखा प्रमुख उपस्थित होते.