ॲड. मनीश गडदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली ही मागणी

0

सोलापूर दि.२८: सोलापूर शहर व जिल्ह्यातील समस्त नागरिकांच्या सेवेसाठी जीवनदाई योजनेत शहरातील प्रमुख व नामवंत ज्या हॉस्पीटलकडे सर्व अद्यावत यंत्रणा व आधुनिक सामग्री आहे यांचा जाणिवपूर्वक समावेश करावा अशी आग्रही मागणी ॲड. मनीश गडदे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांचेकडे केली आहे.

मनीश गडदे यांनी निवेदनात म्हंटले आहे की, सोलापूर शहर व जिल्ह्यात महात्मा फुले जनआरोग्य व आयुष्यमान भारत पीएमजेएवाय योजनेतून गरीब मध्यमवर्गीय रुग्णांवर करण्यात येत असलेल्या उपचारांकरिता निर्धारित केलेल्या सद्यस्थितीतील रुग्णालये यांच्या व्यतिरिक्त अजून काही प्रमुख व महत्त्वाच्या रुग्णालयांचा समावेश होणे अत्यंत गरजेचे आहे.

सध्या सदर योजनेत लाभ मिळत असलेल्या बहुतांश रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर, रेस्पिरेटरी सिस्टमची कमतरता असल्याचे जाणवते. यामुळे सोलापुरातील सर्व सुविधांनी युक्त सुपर स्पेशालिटी व ट्रामा केअर यंत्रणा कार्यान्वित असलेली प्रमुख व महत्त्वाची रुग्णालये शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेत समाविष्ट केल्यास रुग्णांना अत्यंत चांगल्या दर्जाच्या उपचार मिळून जीवित हानी होणार नाही व चांगले उपचार मिळतील.

तरी कृपया सदर मागणीचा लोकहितास्तव गांभीर्यांने विचार व्हावा व माणसांचा जीव वाचवण्याची अद्यावत यंत्रणा असलेल्या सर्व प्रमुख रुग्णालयांचा प्राधान्याने व जाणीवपूर्वक वरील योजनेत समावेश करण्यात यावा ही आग्रही विनंती. असे मनीश गडदे यांनी निवेदनात म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here