Solapur: एक लाखाची लाच स्विकारताना मंडल अधिकारी व खाजगी इसमास अटक

Solapur News: गुन्हा नोंद न करण्यासाठी मागितले होते 1 लाख रुपये

0

पंढरपूर,दि.21: Solapur News: मुरुमाचे बेकायदेशीरीत्या उत्खनन करुन वाहतूक केल्याप्रकरणी जेसीबी व टिपरवर तुंगतचे मंडल अधिकारी रणजीत मोरे यांनी कारवाई केली होती. गुन्हा नोंद न करण्यासाठी एक लाखाची लाच स्विकारताना मंडल अधिकारी रणजीत मोरे व खाजगी इसम शरद मोरे (रा.मुंडेवाढी ता.पंढरपूर) यांना लाचलूचपत विभागाने ताब्यात घेतले आहे.

सदरची कारवाई शुक्रवारी दुपारी करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, भाडयाच्या जेसीबीच्या सहाय्याने तक्रारदार व्यक्तीने मुरुमाचे बेकायदेशीरित्या उत्खनन करुन टिपरद्वारे वाहतूक केली होती. तुंगतचे मंडल अधिकारी रणजित मोरे यांनी टिपर व जेसीबीवर कारवाई केली होती. सदर प्रकरणात गुन्हा नोंद न करणे व टिपरवर कारवाई न करण्यासाठी मंडल अधिकारी रणजीत मोरे यांनी खासगी व्यक्ती शरद मोरे (रा.मुंडेवाढी ता.पंढरपूर) यांच्यामार्फत एक लाखाची मागणी केली होती. याबाबत तक्रादाराने लाचलुचपत विभागाने तक्रार केली होती. शुक्रवारी एक लाखांची लाच स्विकारताना मंडल अधिकारी रणजीत मोरे व शरद मोरे रंगेहाथ पकडले आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार शिरीष सोनवणे, प्रमोद पकाले, अतुल घाडगे, स्वप्निल सण्णके व श्याम सुरवसे यांनी केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here