ममता बॅनर्जी यांचे काँग्रेसला आव्हान म्हणाल्या हिंमत असेल तर भाजपाला…

0

मुंबई,दि.2: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला आव्हान दिले आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या काँग्रेसमध्ये हिंमत असेल तर त्यांनी वाराणसीत भाजपाचा पराभव करून दाखवावा. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेस पक्ष एवढा अहंकारी का आहे, हे मला समजत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. अलिकडे ममता बॅनर्जी यांनी स्वबळाचा नारा दिला होता.

ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना म्हणाल्या, काँग्रेस 300 पैकी 40 जागा जिंकू शकेल की नाही, असे मला वाटत नाही. काँग्रेस पक्ष पूर्वी जिथं जिंकायचा, तिथेही आता पराभूत होत आहे. काँग्रेसमध्ये हिंमत असेल तर बनारसमध्ये (वाराणसी) भाजपला हरवून दाखवावे. वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रतिनिधित्व करतात.

त्या म्हणाल्या, काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा बंगालमध्ये आली होती. पण मला सांगितलंही नव्हतं. आम्ही भारताच्या युतीत आहोत. मात्र असे असूनही मला याबाबत माहिती देण्यात आली नाही. याबाबत मला प्रशासनाकडून माहिती मिळाली.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, उत्तर प्रदेशात आम्ही निवडणूक जिंकली नाही. राजस्थानमध्येही तुम्ही निवडणुका जिंकल्या नाहीत. अलाहाबादमध्ये जाऊन जिंकण्याची हिम्मत आहे आणि वाराणसीत जिंकून दाखवून द्या. तुमची हिम्मत किती आहे ते पण बघू. 

फोटोशूट सध्या ट्रेंडमध्ये आहे

राहुल गांधी यांच्या मुर्शिदाबादमधील विडी कामगारांच्या भेटीवरही बॅनर्जी यांनी निशाणा साधला आणि सांगितले की, आजकाल फोटोशूटचा नवा ट्रेंड पाहायला मिळत आहे. चहाच्या टपऱ्यांवर कधीही न गेलेले लोक आता विडी कामगारांसोबत बसून त्यांचे फोटो क्लिक करत आहेत. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमधील विडी कामगारांची भेट घेतली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here