लाडकी बहीण योजनेचा लाभ मोबाईलवरून घेता येणार, असा करा अर्ज

0

मुंबई,दि.3: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (28 जून 2024) राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ लागू करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं. लाडकी बहीण योजनेतून राज्यातील महिलांना 1 जुलै 2024 पासून दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. या योजनेच्या पात्रतेत अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याची अट होती.

आता लाभार्थी महिलांकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी कोणतंही एक प्रमाणपत्र ग्राह्य धरता येईल. सदर योजनेत पाच एकर शेतीची अट होती. ती आता वगळण्यात आली आहे”, अशी मोठी घोषणा अजित पवार यांनी केली. या योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 असं होतं. आता तोच वयोगट 21 ते 65 असा करण्यात येतोय.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला पंढरपुरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे. तलाठी कार्यालय, सेतू ते नागरी सुविधा केंद्रांमध्ये महिलांची गर्दी पहायला मिळत आहे. अर्ज भरण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करताना अनेक अडचणी येत आहेत यामुळे अर्जदार महिला त्रस्त झाल्या आहेत. अशातच आता मोबाईलवरुन देखील या योजनाचा लाभ घेता येणार आहे. लाडकी बहिण योजनेसाठी ऑनलाईन पोर्टल सुरु कण्यात आले आहे. यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणे सोईचे होणार आहे. 

ॲंन्ड्राईड मोबाईल धारकांसाठी “Narishakti Doot”

ज्या महिलांना मोबाईलच्या माध्यमातून हा अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठीही राज्य सरकारने नारीशक्ती दूत नावाच्या अ‍ॅपचा वापर करण्याचा पर्याय दिलेला आहे. महिलेच्या डोक्यावर फेटा असं चित्र असलेलं ‘नारीशक्ती दूत’ अ‍ॅप डाऊनलोड करून तुम्हाला अर्ज भरता येऊ शकतो.  त्यासाठी अ‍ॅपमध्ये जाऊन तुमची माहिती भरून आपलं प्रोफाईल तयार करावे.  

असा करा अर्ज

अर्जदार महिलांना नारीशक्ती दूत अ‍ॅपवर सर्व प्रथम प्रोफाईल तयार करावे आहेत. त्यानंतर कॅटेगरीची निवड करा.  त्यानंतर ‘लाडली बहीण योजना’ यावर क्लिक करून नाव, पत्ता, बँक खात्याचे डिटेल्स आणि इतर माहिती भरा. सोबत अर्जदार महिलेचा फोटोही जोडायचा आहे.  शिवाय लागणारी इतर कागदपत्र जोडून तुमचा अर्ज तुम्ही पूर्ण करू शकता. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here