पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीची बैठक, उमेदवार…

Maharashtra Politics: उमेदवार उद्या जाहीर करणार

0

मुंबई,दि.3: Maharaashtra Politics: पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीची बैठक पार पडली. कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकासआघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते. नीलम गोऱ्हे यांच्या घरी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. नाना पटोले, जयंत पाटील, छगन भुजबळ, सुभाष देसाई या नेत्यांमध्ये दोन्ही पोटनिवडणुकींवरून चर्चा झाली. तिन्ही पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून अंतिम निर्णय उद्या होईल, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. (MVA)

उमेदवारांबाबतचा निर्णय उद्या | महाविकास आघाडीची बैठक

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढू, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. दोन्ही मतदार संघाच्या उमेदवारांबाबतचा निर्णय उद्या (4 फेब्रुवारी) जाहीर करु, असं देखील ते म्हणाले. महाविकास आघाडीची आज मुंबईत कसबा आणि चिंचवड मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

बैठकीत तिन्ही पक्षांनी एकत्र येत चर्चा केली | MVA

जयंत पाटील म्हणाले की, आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत दोन्ही मतदार संघाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. बैठकीत तिन्ही पक्षांनी एकत्र येत चर्चा केली आहे. आमचे आणखी काही मित्र पक्ष आहे. त्या सगळ्या मित्र पक्षाशी चर्चा करणं आवश्यक आहे. त्या सगळ्यांशी आम्ही आज चर्चा करणार आहोत. त्यासोबतच पक्षाच्या वरिष्ठांशी देखील चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असं ते म्हणाले. आमचे घटक पक्ष आहेत त्यांना आम्ही प्रत्येक निर्णयात सहभागी करुन घेतो. ही प्रथा गेली अनेक वर्षांपासून सुरु आहे, असाही टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

दोन्ही मतदार संघाच्या निवडणुका एकत्र आणि | Maharashtra Politics

नाना पटोले म्हणाले की, दोन्ही मतदार संघाच्या निवडणुका एकत्र आणि एकजुटीने लढणार आहोत. त्यासोबतच दोन्ही मतदार संघात महाविकास आघाडीचा उमेदवार कसा निवडून येईल, यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत. कसब्यात कोणत्या पक्षाला जागा दिली जाणार आणि चिंचवडमध्ये कोणत्या पक्षाला जागा दिली जाणार यासंदर्भातील घोषणा उद्या करणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. दोन्ही मतदार संघाच्या जागा महाविकास आघाडीच जिंकेल, असा दावाही त्यांनी केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here