Supreme Court On Maharashtra Political Crisis: सुप्रीम कोर्टाने सत्तासंघर्षाचा निकाल राखून ठेवला

Maharashtra Political Crisis: राज्याच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडली

0

नवी दिल्ली,दि.16: Supreme Court On Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडेच ठेवायचे की 7 जणांच्या खंडपीठाकडे सोपवायचे यावर निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. गेले तीन दिवस सलग सुरु असलेल्या सुनावणीतील युक्तीवाद, प्रतिवाद संपला आहे. यासाठी खंडपीठाने लंच ब्रेक पुढे ढकलला होता. (Maharashtra Political Crisis)

शिवसेनेचे नेते प्रचंड आशावादी | Maharashtra Political Crisis

राज्याच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडली आहे. शिवसेनेकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला आहे. त्यामुळे सेनेचे नेते प्रचंड आशावादी झाले आहे. तर शिंदे गटाच्या नेत्यांनीही आपल्यावर अपात्रतेची कारवाई होणार नाही, असा दावा केला आहे.

खंडपीठाने सत्तासंघर्षाचा निकाल राखून ठेवला | Supreme Court On Maharashtra Political Crisis

सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने सत्तासंघर्षाचा निकाल राखून ठेवला आहे. हा निकाल आज येईल, उद्या येईल किंवा आठ दिवसांनी येईल, कोणत्याही क्षणी येऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. नबाम रेबिया, पाच की सात जणांच्या खंडपीठाकडे प्रकरण सोपवायचे की नाही यावर खंडपीठाचे सदस्य चर्चा करतील. यानंतर पुढील निर्णय देतील, असे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितले. 

आम्ही निर्णयाची प्रतिक्षा करत आहोत

आम्ही निर्णयाची प्रतिक्षा करत आहोत. आज युक्तिवाद पूर्ण झाला आहे. हे प्रकरण 7 खंडपीठाकडे जावं, अशी आमची मागणी आहे. नबाम रेबिया प्रकरणामध्ये योग्य सुनावणी झाली आहे. कपिल सिब्बल आणि सिंघवी यांनी चांगला युक्तिवाद केला आहे. त्यामुळे हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जाईल, असा विश्वास आमदार अनिल परब यांनी व्यक्त केला.

शिंदे गटाने जो मेल केला होता, त्याचे उत्तर काय असेल हे त्यांना माहिती होते. पण, त्यांनी तो शेवटपर्यंत मेलची माहिती समोर आणली नाही. आम्ही ती बाब कोर्टासमोर आणली आहे, असा खुलासा परब यांनी केला.

आमच्याकडून कपिल सिब्बल आणि सिंघवी यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. निकाल राखून ठेवला आहे. ज्या प्रकारे युक्तिवाद झाला आहे, एका आठवड्यात निर्णय येणे अपेक्षीत आहे. निर्णय हा ठाकरे गटाच्या बाजूला लागणार आहे, याचे परिणाम राज्यावर पाहण्यास मिळेल, असा विश्वास अनिल देसाई यांनी व्यक्त केला.

मी तुमच्या पाया पडतो…

“घटनेच्या 10 व्या सूचीचा आधार घेऊन सरकार पाडण्यासाठी मार्ग तयार करुन देऊ नका. हे प्रकरण फक्त सध्यापुरतं मर्यादित नाही. यापुढील काळातही अशी प्रकरणं उद्भवू शकतात आणि 10 व्या सूचीच्या आधारे देशातील सरकारं पाडू देऊ नका. हा प्रश्न वेळोवेळी उपस्थित होईल. निवडून आलेली सरकारे पाडली जातील. कोणत्याही लोकशाहीला ते परवडणारे नाही. त्यामुळे कृपया हे प्रकरण फक्त चर्चेचा विषय आहे असं म्हणू नका. मी तुमच्या पाया पडतो. दहाव्या सूचीच्या आधारावर सरकार पाडू देऊ नका”, असा जोरदार युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी कोर्टात केला आहे. 

सरन्यायाधीशांचे शिंदे गटाबाबत मोठं विधान

राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणीचा आज तिसरा दिवस आहे आणि दोन्ही पक्षाकडून पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे जोरदार युक्तीवाद सुरू आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत असताना सरन्यायाधीशांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. शिंदे गटाकडून बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे पुढची खेळी ओळखली गेली. पुढे काय होणार हे शिंदे गटाला माहित होतं, असं विधान सरन्यायाधीशांनी केलं आहे. ठाकरे गटाची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू असतानाच सरन्यायाधीशांनी वरील विधान केलं आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here