मुंबई,दि.३०: Maharashtra Politics: शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. केंद्र सरकार कायद्याचा गैरवापर करत आहे, शत्रुवरही अशी वेळ येऊ नये. सत्ताधारी अमानुष वागत आहेत, असा आरोप खासदार राऊत यांनी केंद्र सरकारवर केला.
हेही वाचा Rishabh Pant: अपघातानंतर क्रिकेटर ऋषभ पंत एकटाच कारमध्ये अडकलेला, आग लागली…
अनिल देशमुख हे… | Maharashtra Politics
अनिल देशमुख हे महाराष्ट्राचे गृहमंत्री होते, त्यांनी अनेक मोठ्या नेत्यांसोबत काम केले आहे. विदर्भात त्यांनी नेतृत्व केले आहे. ज्या पद्धतीने मला, अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यावर सत्तेचा गैरवापर केला. पण, आम्ही कायद्याची लढाई करुन घरी पोहोचलो. कायदा काय सांगतो दहशतवादी निर्माण करणाऱ्यांसाठी हा कायदा केला. असा प्रसंग आमच्यावर आला, त्यावेळी आमच्या कुटुंबावर कशी वेळ आली असेल सांगू शकत नाही. अशी वेळ शत्रुवरही येऊ नये, असं खासदार संजय राऊत म्हणाले.
जामीनावेळी न्यायालयाने जे निरिक्षण नोंदवले… | Sanjay Raut
‘अनिल देशमुख यांच्या जामीनावेळी न्यायालयाने जे निरिक्षण नोंदवले आहे, ते महत्वाच आहे. माझ्या जामीनावेळी जी निरिक्षण केली तीही महत्वाची आहेत. सध्या सत्ताधारी अमानूष वागत आहेत, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.
त्या संकटातून मीही गेलो आहे… | Maharashtra News
‘अनिल देशमुख ज्या संकटातून गेले आहेत. त्या संकटातून मीही गेलो आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा सातत्याने गैरवापर सुरू आहे. अनिल देशमुखांची कारकीर्द निष्कलंक आहे. सरकार कायद्याचा गैरवापर करत आहे, असंही संजय राऊत म्हणाले.