Ambadas Danve: शिवसेना नेते अंबादास दानवे यांचा पदाधिकाऱ्यांना iPhone वापरण्याचा सल्ला

0

मुंबई,दि.2: Ambadas Danve On iPhone: शिवसेना (ठाकरे गट) नेते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी पदाधिकाऱ्यांना iPhone वापरण्याचा सल्ला दिला आहे. आयफोन हे सर्वात महाग असतात. अनेकजण प्रतिष्ठेचा विषय म्हणून आयफोन वापरतात. अशातच अंबादास दानवे यांनी आयफोन वापरण्याचा सल्ला दिला आहे. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने हाच आयफोन ज्यांना शक्य आहे त्यांनी वापरावा असा सल्ला दानवे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना दिला आहे. या सूचना पक्षाकडून आल्या नाही. परंतु जबाबदार लोकांनी जबाबदारीनं बोललं आणि वागलं पाहिजे. चार लोकांत बोलताना काही शब्द निघतात. मग त्याचा बाऊ केला जातो त्यामुळे सुरक्षितता म्हणून काही बंधनं पाळली पाहिजेत असं दानवेंनी म्हटलं.

रश्मी शुल्का यांना फोन टॅपिंग करायला… | Ambadas Danve On iPhone

दानवे म्हणाले की, मागच्या काळात सरकारनं रश्मी शुल्का यांना फोन टॅपिंग करायला सांगितले होते. सरकारसुद्धा मुद्दामहून जाणीवपूर्वक राजकारण करण्यासाठी मुख्य नेत्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवले जाते म्हणून सुरक्षितता घेतली पाहिजे. लक्ष असल्याने घाबरण्याची गरज नाही मात्र तरीही मी माझ्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना आयफोन वापरावा असा सल्ला देत असतो. 

आत्ताचं सरकार कुठल्याही स्तरावर जाऊ शकते… | Ambadas Danve

तसेच मागच्या काळात जे घडले आहे तसं आत्ताचं सरकार कुठल्याही स्तरावर जाऊ शकते. लहान लहान माणसांना, शिवसैनिकांना त्रास दिला जातोय. अशा परिस्थितीत सरकारवर विश्वास असण्याचा प्रश्नच नाही. आमचा या सरकारवर बिल्कुल विश्वास नाही. त्यामुळे सरकार काही गोष्टींचा गैरवापर करू शकते म्हणून आपण आपली खबरदारी घ्यावी अशा सूचना सातत्याने मी सगळ्यांना देत असतो असं अंबादास दानवेंनी म्हटलं. 

दरम्यान, सगळ्यांनी आयफोन घ्यावा असं म्हटलं नाही. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी आयफोन वापरावा असं म्हटलं आहे. त्यामुळे फारकाही वार्डात काम करणारे, गावात काम करणारे, बऱ्याच जणांकडे फोनही नसतात. परंतु जे प्रमुख नेते जबाबदार पदावर असताना त्यांनी सुरक्षितता घेतली पाहिजे असं अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले. 

आयफोन कुणाला परवडत नाही आता…

आयफोनची किंमत मोठी आहे. जो संदेश गेला तो राज्यातील जनतेसमोर चुकीचा जाऊ शकतो. आयफोन कुणाला परवडत नाही, आता कार्यकर्ते तेवढे श्रीमंत झाले असतील. मी शिवसेनेत आलो तेव्हा वडापाव खाऊन प्रचार करणारे शिवसैनिक होते. कुठलीही अपेक्षा न करता वडापाव खाऊन शिवसैनिकांनी काम केलंय त्यामुळे आयफोनवर बोलू शकत नाही असा टोला मंत्री दिपक केसरकरांनी अंबादास दानवेंना लगावला आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here