Ajit Pawar: राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी दिले स्पष्टीकरण

0

मुंबई,दि.१७: राष्ट्रवादीचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) स्पष्टीकरण दिले आहे. माध्यमात पवारांविषयी नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. शिवाय अजित पवारांनी मुंबईत राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलावली असल्याची चर्चा सुरू झाली. अशातच अजित पवार काही आमदारांसह भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आज अचानक अजित पवार यांनी पुण्यातील नियोजित कार्यक्रम रद्द केल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे पवर राष्ट्रवादीतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.या चर्चांवर आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी ट्विट करुन स्पष्टीकरण दिले आहे. (Ajit Pawar News Today)

अजित पवारांचे स्पष्टीकरण | Ajit Pawar

“खारघर (नवी मुंबई) येथे रविवारी झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या श्रीसदस्यांच्या कुटुंबियांना व उष्माघातामुळे बाधित झालेल्या श्रीसदस्यांना भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी मी ‘एमजीएम’ हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटेपर्यंत उपस्थित होतो, असं ट्विटमध्ये अजित पवार यांनी म्हटले आहे. (Ajit Pawar News Today)

“सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता. मी मुंबईतच आहे. उद्या, मंगळवार दि. १८ एप्रिल २०२३ रोजी मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमित कामकाज सुरु राहणार असल्याचेही पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले आहे. (Maharashtra Politics)

“मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्या पूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, याची नोंद घ्यावी, असं स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ट्विट करुन दिले आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here