क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण
दि.7: क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अनेक लोकांच्या अटकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आज दुसरा व्हिडिओ जारी केला आहे, ज्यात के व्ही गोसावी आणि मनीष भानुशाली NCB कार्यालयात प्रवेश करत असल्याचे दिसून येत आहे. त्याच रात्री रेव्ह पार्टीवर छापा टाकण्यात आला होता.
व्हिडिओ शेअर करत नवाब मलिक यांनी ट्वीट केले, “हा व्हिडिओ किरण पी गोसावी आणि मनीष भानुशाली यांचा आहे, त्याच रात्री क्रूझ जहाजावर छापा टाकला गेला होता.”
Here’s the video of Kiran P Gosavi and Manish Bhanushali entering the NCB office the same night the cruise ship was raided. pic.twitter.com/25yl9YsrSJ
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 6, 2021
तत्पूर्वी बुधवारी मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन एनसीबीच्या सध्याच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आणि त्यावर भाजपच्या दबावाखाली काम केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की कोठडीत आर्यन खानसोबतचा सेल्फी व्हायरल कसा झाला? सेल्फी काढणारी व्यक्ती कोण आहे, हा तपासाचा विषय आहे. ते म्हणाले की, ते पंच साक्षीदार आहेत हे कळले आहे, पण प्रश्न असा आहे की कोणताही साक्षीदार आरोपीसोबत फोटो काढू शकतो का. एवढेच नाही तर ती व्यक्ती आर्यनचा हात पकडून आणताना दिसली आहे.