Maharashtra Karnataka News | महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा तात्पुरती स्थगित

Maharashtra Karnataka News | महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद दिवसागणिक पेटत चालला आहे

0

सोलापूर,दि.7: Maharashtra Karnataka News | महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद (Maharashtra Karnataka Border Dispute) वाढतच चालला आहे. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील व जत तालुक्यातील गावांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Maharashtra Karnataka News | उडगी गावाचा कर्नाटकात जाण्याचा निर्णय

सोलापूर जिल्ह्यातील उडगी गावातील नागरिकांनी मूलभूत सुविधा मिळत नसल्याने कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला. सीमावर्ती भागातील गावांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे. बेळगावमधील हिरे बागेवाडी टोल नाक्याजवळ कन्नड संघटनांकडून महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक करण्यात आली होती.

Maharashtra Karnataka News | महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा तात्पुरती स्थगित

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीमधील जत तालुका आणि सोलापूर, अक्कलकोटवर दावा सांगितल्यानंतर सीमावाद दिवसागणिक पेटत चालला आहे. या वादाचा पुन्हा एकदा परिणाम एसटीच्या वाहतुकीवर झाला असून महाराष्ट्रातून आज सुरु झालेली बससेवा पुन्हा तात्पुरती स्थगित झाली आहे. कोल्हापूरमधून बेळगाव व निपाणीच्या दिशेने दोन बस रवाना झाल्या. या बसेस तेथून पुन्हा कोल्हापूरच्या दिशेने येत आहेत. मात्र, त्यानंतर बससेवा पुन्हा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. दुसरीकडे कर्नाटक परिवहनची एकही बस महाराष्ट्रात आलेली नाही.

Maharashtra Karnataka News | हिरे बागेवाडीजवळ ट्रकवर दगडफेक

बेळगावमधील हिरे बागेवाडी टोल नाक्याजवळ कन्नड संघटनांकडून महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक करण्यात आली होती. दुसरीकडे, बेळगाव शहर आणि परिसरात कन्नड संघटनांनी मंगळवारी हैदोस घातला.कालापासून दोन्ही राज्यांमधील वातावरण बिघडण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील हिरे बागेवाडीजवळ राज्यातील वाहनांना लक्ष्य करण्यात आले होते. यावेळी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. सीमा समन्वयक मंत्र्यांची नेमणूक केल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई बेळगावला जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीची भेट घेणार होते. मात्र, मंत्री बेळगावात येऊ नये यासाठी गेल्या चार ते पाच दिवसांपासून कन्नड संघटनांनी बेळगावात हैदोस घालण्याचा प्रयत्न केला आहे.

Maharashtra Karnataka News | शिवसेना ठाकरे गटाचा कर्नाटकात घुसण्याचा प्रयत्न

दुसरीकडे, कर्नाटकमध्ये राज्यातील वाहनांवर झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांनी कर्नाटकात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिला शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारला बांगड्यांचा आहेर देत निषेध केला. चंद्रकांत पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई यांचाही निषेध केला. दरम्यान, या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अडवत ताब्यात घेतले. या सर्वांना गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात नेऊन सोडून दिले. दरम्यान, रेणुका यात्रेला गेलेल्या भाविकांना धक्का पोचविल्यास जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here