Maharashtra Karnataka | महाराष्ट्राचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना फोन

Maharashtra Karnataka News | देवेंद्र फडणवीस यांनी बसवराज बोम्मई यांच्याकडे नाराजी व्यक्त केली

0

मुंबई,दि.6: Maharashtra Karnataka News | महाराष्ट्राचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांना फोन केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बसवराज बोम्मई यांना फोन करून नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील बेळगावमधल्या हिरेबागवाडी टोल नाक्यावर कन्नड संघटनांनी महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेकीमुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी बसवराज बोम्मई यांना फोन केला. बेळगावजवळ हिरेबागवाडी टोलनाक्याजवळ झालेल्या घटनेबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दात नाराजी आणि निषेध नोंदवण्यात आला.

Maharashtra Karnataka | हिरेबागवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक

कन्नड संघटनांनी महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक केली. हिरेबागवाडी टोल नाक्यावर कन्नड रक्षण वेदिके या संघटनेकडून ही दगडफेक करण्यात आली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी ट्रकवर झेंडे मिरवले. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. कन्नड संघटनांच्या या दगडफेकीनंतर कर्नाटक सरकारने कारवाई करावी अशी मागणी राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी केली. त्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन करुन निषेध व्यक्त केला.

Maharashtra Karnataka | महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना संरक्षण देऊ: बसवराज बोम्मई

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यात दूरध्वनीवरुन संभाषण झालं. यावेळी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनांमध्ये लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन दिलं. तसंच महाराष्ट्रातून येणार्‍या वाहनांना संरक्षण दिले जाईल, असंही त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणात आश्वस्त केलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here