मुंबई,दि.७: पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचे मुसळधार पावसामुळे अतोनात नुकसान झाले. राज्यातील अनेक भागात पूर परिस्थिती उद्भवली होती. पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोलापूर, लातूर, धाराशिव आणि राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आला होता. अतिवृष्टीने शेती आणि ग्रामीण भागाला झालेल्या प्रचंड विध्वंसामुळे शेतकऱ्यांच्या जीवनावर मोठा आघात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या निर्णयांना मंजुरी मिळाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना या पॅकेजची विस्तृत माहिती दिली, ज्यामुळे प्रभावित भागातील हाहाकार कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
घरांची पडझड झाली, तिथे घरे उभारली जातील, ५० हजार रूपयांची मदत दुकानदारांना करणार आहेत. दुधाळ जनावरांसाठी ३७ हजार ५०० रूपये मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. ३ जनावरांची अट रद्द केली आहे. जेवढी जनावरे दगावली तेवढी मदत दिली जाईल. खरडून गेलेली जी जमीन आहे तिथे ४७ हजार हेक्टरी रोख आणि ३ लाख रूपये हेक्टरी नरेगाच्या माध्यमातून देणार आहोत.
ज्या विहिरींमध्ये गाळ गेलाय, नुकसान झाले आहे तिथे विशेष बाब म्हणून ३० हजार रूपये प्रति विहीर भरपाई दिले जाणार आहे. पायाभूत सुविधांचे जिथे नुकसान झाले तिथे १० हजार कोटी मदत केली जाणार आहे असं त्यांनी सांगितले.
अतिवृष्टीमुळे ६८ लाख ६९ हजार हेक्टर पिकांचे पूर्ण किंवा अंशतः नुकसान झाले असून, २९ जिल्ह्यांतील २५३ तालुक्यांतील २०५९ ग्रामपंचायतींना सरसकट मदत करण्यात येईल. राज्य सरकारने ३२ हजार कोटी रुपयांच्या व्यापक पॅकेजची घोषणा केली आहे. यात थेट ६१७५ कोटी रुपयांची आर्थिक सहाय्य, पीकविम्याखाली किमान ५ हजार कोटी आणि रब्बी हंगामासाठी बियाणे व इतर संसाधनांसाठी ६१७५ कोटींची अतिरिक्त तरतूद आहे. ‘नुकसानाची शतप्रतिमान्य भरपाई शक्य नसली तरी, आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करू.’ असे फडणवीस म्हणाले.








