मुंबई,दि.20: महाराष्ट्रात आज 20 नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान पार पडले आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. मात्र याअगोदर एक्झिट पोलचे अंदाज समोर येत आहेत. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी अर्थात बहुमतासाठी एकूण 145 जागा आवश्यक आहेत. नुकताच ‘इलेक्ट्रोल एज’चा पोल समोर आला आहे. यात भारतीय जनता पार्टी (भाजपा) राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. तर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येताना दिसत आहे.
इलेक्टोरल एजच्या एक्झिट पोलनुसार, महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाविकास आघाडीला 150 तर महायुतीला 118 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महायुती
भाजपा- 78
शिवसेना शिंदे गट- 26
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 14
महाविकास आघाडी
काँग्रेस- 60
शिवसेना (ठाकरे गट)- 44
राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 46