Maharashtra Breaking: महाराष्ट्रातील राजकारणात मोठा भूकंप, अजित पवार मंत्रिपदाची शपथ घेणार

0

मुंबई,दि.२: Maharashtra Breaking: महाराष्ट्रातील राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) अचानक राजभवनात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेत नेतेही उपस्थित आहेत.  25 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र अजित पवारांकडे आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अजित पवार महाराष्ट्राच्या सत्तेत सामील होणार असून, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Maharashtra Breaking

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील राजभावनात दाखल झाले आहेत. याशिवाय, भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदे गटाचे जवळपास सर्वच नेतेही राजभवनात आले आहेत. राजभवनात शपथविधीची तयारी झाली असून, येत्या काही वेळात शपथविधी सोहळा होणार आहेत.

अद्याप कोणते नेते मंत्रिपदाची शपथ घेणार, याबाबत ठोस माहिती मिळू शकलेली नाही. पण, प्राथमिक माहितीनुसार, अजित पवार, छगन भूजबळ, धनंजय मुंडे,आदिती तटकरे, दिलीप वळसे पाटील यांसारखे दिग्गज नेते सत्तेत सामील होणार आहेत. 

अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी उत्सुक असल्याचं बोललं जात होतं. त्यासाठी अजित पवार आपल्या समर्थक आमदारांच्या वतीने पक्षावर दबाब टाकत होते, अशीही चर्चा सुरू होती. यानंतर आता अजित पवार राजभवनावर दाखल झाले आहेत. येत्या काही तासांत अजित पवारांसह राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here