Maharashtra 12th Result 2024: बारावी परिक्षेचा निकाल उद्या होणार जाहीर

0

मुंबई,दि.20: Maharashtra 12th Result 2024: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षेच्या निकालाची माहिती देण्यात आली आहे. बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 यादरम्यान पार पडली. राज्य बोर्डाकडून उद्या दुपारी 1 वाजता 12 वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. या निकालाकडे राज्यातील लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचं लक्ष लागून होतं. अखेर आज राज्य मंडळाने पत्रकार परिषद घेऊन निकालाची तारीख जाहीर केली आहे.

ऑनलाइन पद्धतीने हा निकाल जाहीर होणार असून निकाल जाहीर झाल्यानंतर 5 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करण्याची असल्यास अर्ज करता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. ‘सीबीएसई’ परीक्षांचा निकाल यापूर्वीच जाहीर झाला आहे. 

राज्य मंडळाच्या सचिवा अनुराधा ओक यांनी बारावीच्या निकालाबाबतचे सोमवारी पत्र प्रसिद्ध केलं आहे. त्यानुसार मंगळवार  21 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. 

असा पाहा निकाल  | Maharashtra 12th Result 2024

महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत mahresult.nic.inresults.gov.in संकेतस्थळावर जा

महाराष्ट्र बोर्ड निकाल पोर्टल लिंकवर जा

HSC निकाल लिंकवर क्लिक करा

रोल नंबर आणि इतर क्रेडेन्शियल एंटर करा

12 वीची मार्कशीट तुमच्या समोर स्क्रीनवर दिसेल

पुढील संदर्भासाठी महाराष्ट्र बोर्डाचा निकाल डाऊनलोड करून ठेवता येईल


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here