LPG Price Hike: पेट्रोल, डिझेलनंतर आता घरगुती गॅस सिलिंडरमध्ये मोठी दरवाढ

0

LPG Price Hike: रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia Ukraine War) सुरु असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या वाढीचे परिणाम आता दिसू लागले आहेत. पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढविल्यानंतर आज सामान्यांवर आणखी एक महागाईचा आगडोंब कोसळला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. 

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैसे प्रति लीटर एवढी वाढ झाली आहे. आज सकाळपासून हे नवे दर लागू झाले आहेत. युक्रेन-रशिया युद्धामुळे इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आता आजपासून दररोज पेट्रोल, डिझेलचे दर वाढणार आहेत. तसेच आधीचा विक्रम देखील मोडण्याची शक्यता आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरांना आग लागलेली असताना दुसरीकडे एलपीजी सिलिंडरच्या (LPG Cylinder) किंमतीमध्येही वाढ झाली आहे.

इंडियन ऑईलनुसार (Indian Oil) घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपये प्रति सिलिंडर दरवाढ झाली आहे. या नव्या किंमती आजपासूनच लागू होणार आहेत. ही दरवाढ 14.2 किलोच्या सिलिंडवर करण्य़ात आली आहे. यामुळे आजपासून या सिलिंडरच्या किंमती 949.50 प्रति सिलिंडर असणार आहेत. 

पेट्रोल आणि डिझेलही महागलं
देशात गेल्या अनेक महिन्यांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अखेर वाढ झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 80 पैशांची वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल 84 तर डिझेल 83 पैशांनी महागलं आहे. राजधानी दिल्लीमध्ये आज म्हणजेच 22 मार्च 2022 ला पेट्रोलचा दर 95 रुपये 41 पैशांवरुन वाढत प्रतिलीटर 96 रुपये 21 पैसे झाला आहे. तर डिझेलचा दर 86 रुपये 67 पैशांवरुन 87 रुपये 47 पैशांवर पोहोचला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here