कोट्यावधी रुपयांचा जमीन घोटाळा प्रकरण, उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांच्या चौकशीचे आदेश

0

सोलापूर,दि.16: उत्तर सोलापूर येथील सरकारी जमीनीचा मोठा घोटाळा झाला होता. सरकारी जमीन अंदाजे 50 कोटी रुपयांची असावी. या जमीन घोटाळा प्रकरणी सोलापुरातील सामाजिक कार्यकर्ते जयराज नागणसुरे यांनी आवाज उठवला होता. जयराज नागणसुरे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

5 सप्टेंबर रोजी लोकायुक्तांनी या प्रकरणाबाबत सुनावणी ठेवली होती. त्या संदर्भात सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी या प्रकरणात मुदत वाढवून घेतली होती. त्यामुळे लोकायुक्तांनी 21 सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजता पुढील सुनावणी ठेवली आहे.

काय आहे प्रकरण?

जयराज नागणसुरे यांनी सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र याची दखल न घेतल्याने नागणसुरे यांनी विभागीय आयुक्त सौरव राव यांच्याकडे तक्रार केली. याचीही दखल न घेतली गेल्याने त्यांनी राज्याचे तत्कालीन महसूल मंत्री व मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली. जयराज नागणसुरे यांनी सतत पाठपुरावा करत याची तक्रार लोकायुक्त विद्यासागर कानडे यांच्याकडे केली.

लोकायुक्तांनी याची दखल घेत चौकशीचे आदेश दिले. उत्तर सोलापूर येथील सरकारी जमीन अंदाजे 50 कोटी रुपयांची जमीन परस्पर पक्षकाराच्या नावाने केल्याप्रकरणी सोलापूर उपविभागीय अधिकारी क्रमांक एक हेमंत निकम यांच्या विरोधात जयराज नागणसुरे यांनी लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केल्यानंतर याची दखल घेत लोकायुक्तांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे या प्रकरणात अहवाल सादर करण्यास सांगितले. या प्रकरणात आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता लोक आयुक्त यांनी सुनावणी ठेवली होती. याबाबत सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनाही कळवले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here