सोलापूर,दि.26: सोलापूर शहर उत्तरचे तत्कालीन मंडल अधिकारी सध्या हवेली येथे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या विरोधात 25 पेक्षा जास्त तक्रारी अर्ज आहेत असे असताना या सर्व अर्जावर अर्जदार तक्रारी अर्ज मागे घेत आहे असे पत्र देऊन अजय कुमार गेंगाणे यांची पदोन्नती झाली आहे. जेवढ्या लोकांनी तक्रार दिली आहे त्यानंतर त्याच तक्रारदाराने तक्रारी अर्ज मागे घेतले आहे हा का काय प्रकार आहे? समजत नाही या अधिकाऱ्याच्या विरोधात मीही अनेक तक्रारी दिल्या आहेत. त्याही बोगसह्या करून निकाली काढण्यात आलेले आहेत. असे जयराज नागणसुरे यांनी सांगितले.
सोलापूर उत्तर तहसीलदार जयंत पाटील, उपविभागीय अधिकारी क्रमांक 1 हेमंत निकम, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, विभागीय आयुक्त सौरव राव यांच्याकडे जयराज नागणसुरे यांनी अनेक तक्रारी दिल्या आहेत. पण कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. बोगस एन ए ऑर्डरच्या नोंदी केल्या आहेत, त्या संदर्भात रेकॉर्ड रूमला नक्कल मागितले असते रेकॉर्ड उपलब्ध नाहीत असे अनेक बोगस नोंदी या अधिकार्याने केले आहेत. मयत व्यक्तीच्या नावे सातबारा नोंदी केली आहे, विनापरवाना ट्रान्सपोर्टला महसूल बुङवत असताना पाठीशी घालण्याचे काम केले आहे. असे आरोप करत जयराज नागणसुरे यांनी चौकशीची मागणी केली होती.
ओपन स्पेस मध्ये बोगस प्लॉट करून सातबारा नोंद झाली आहे. मंडल अधिकारी अजय कुमार गेंगाणे यांनी आजतागायत उचलेला पगार व आज त्यांच्याकडे असलेली मालमत्ता ही त्यांच्या ज्ञात उत्पन्न पेक्षा किती तरी पटीने जास्त आहे. लाच लुचपत प्रतिबंधक अधिनियम 1988 मधील तरतुदीनुसार कलम 13 (1 ) व कलम 13 ( 2 ) अन्वये अपसंपदेचा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जयराज नागणसुरे यांनी केली.
अजय कुमार गेंगाणे यांच्या विरोधात एकूण 222 पानाच्या तक्रारी,आणि केलेल्या कारवाईचा अहवाल सोबत जोडला आहे मयत व्यक्तीचे नावे बोगस नोंदी करून पुरावा जोडला आहे या भ्रष्ट अधिकाऱ्याने जी मालमत्ता गोळा केली आहे त्याची यादी जोडली आहे अनेक तक्रारी अर्ज असताना कारवाई करा असे फक्त कागदोपत्री सांगितले जाते वास्तविक कोणतीच कारवाई झाली नाही उलट त्यांची वरिष्ठ अधिकारी म्हणून बढती मिळते असा आरोप जयराज नागणसुरे यांनी केला आहे.
अजयकुमार गेंगाणे यांची सोलापुरात कोट्यावधी रुपयांची मालमत्ता असल्याचे पुरावे जयराज नागणसुरे यांनी सादर केले होते. जयराज नागणसुरे यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे लोकायुक्तांनी नायब तहसीलदार अजयकुमार गेंगाणे यांची लोकायुक्ताकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
अस्वीकरण: बातमीतील दाव्याच्या सत्येतेची हमी सोलापूर वार्ता घेत नाही.