Laxmikant Thonge Patil: लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांची शिंदे गटाच्या शिवसेना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

0

सोलापूर,दि.16: लक्ष्मीकांत ठोंगे पाटील (Laxmikant Thonge Patil) यांची एकनाथ शिंदे गटाच्या (Eknath Shinde Group) शिवसेना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने लक्ष्मीकांत ठोंगे पाटील (Laxmikant Thonge Patil) यांना नियुक्तीपत्र दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला.

लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांचा सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावात चांगला संपर्क आहे. लक्ष्मीकांत ठोंगे पाटील शिवसेनेचे सोलापूर जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख होते. शिवसेनेत असताना त्यांच्यावर अन्याय होत आहे अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना झाली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांची सोलापूर जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख (शिंदे गट) नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना माढा आणि सांगोला असे कार्यक्षेत्र देण्यात आले आहे.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. असे शिवसेना सचिव संजय भाऊराव मोरे यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here