Laxman Hake On Manoj Jarange: लक्ष्मण हाके यांनी केला मनोज जरांगे पाटील यांच्यावर हा आरोप

0

जालना,दि.20: Laxman Hake On Manoj Jarange: ओबीसी आरक्षणासाठी उपोषण करत असलेले लक्ष्मण हाके यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगे यांनी पंकजा मुंडे आणि महादेव जानकर यांना पाडण्यासाठी बैठका घेतल्या असा आरोप हाके यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नादी लागून कितीतरी तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. व्यवस्थेनं मराठा समाज आणि तरुणांमध्ये संभ्रम निर्माण केला असल्याची टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे.

शरद पवार मॅनेजमेंट गुरु

लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. जरांगे यांनी पंकजा मुंडे आणि महादेव जानकर यांना पाडण्यासाठी बैठका लावल्याचा देखील हाके यांनी केला. हाके यांनी शरद पवारांवर सुद्धा टीका केली. पवार निवडणुका जिंकण्याचे फक्त मॅनेजमेंट गुरु असून त्यांनी इथले लोक सोबत घेतले असते, तर ते केव्हाच पंतप्रधान झाले असते असे देखील लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे. यावेळी हाके यांनी मुख्यमंत्री झोपले आहेत. ते मीडिया बघत नाहीत, टीव्ही बघत नाहीत किंवा आंदोलन होत आहेत ते बघत नाहीत, अशी टीका त्यांनी केली. 

शरद पवारांनी 10 पैकी 8 जण मराठा उमेदवार दिले होते. ओबीसी उपोषणाची दखल मुख्यमंत्री घेत नाहीत. आज उपोषणाचा आठवा दिवस आहे. आरक्षण हे सामाजिक मागासवर्गासाठी आहे. मराठा समाजातील तरूणांनी शासनाशी भांडून योजना, धोरणं घेतली पाहिजे. तरूणांनी जरांगेंच्या नादाला लागून आत्महत्या करू नये असं त्यांनी सांगितले.

तसेच ज्या समाजाला हजारो वर्ष मानवतेची वागणूक दिली नाही त्यांना आरक्षण दिले आहे. आरक्षण ही लाभाची योजना नाही. तुम्ही या देशाचे नागरिक आहात, तुम्ही मागास समजून घेऊ नका यासाठी आरक्षण तरतूद आहे. तुम्हाला मिळतंय मग आम्हाला का नाही यासाठी आरक्षण मागणी जरांगे करताय. इतर समाजाशी तुलना केली जाते. जातीय जनगणना सरकारने करायला हवी अशी मागणीही लक्ष्मण हाके यांनी केली. 

लोकसभेला पंकजा मुंडेंना | Laxman Hake On Manoj Jarange

आम्ही कधी आमचा माणूस आमदार नाही खासदार नाही म्हणून तुलना केली का? त्यांनी सांगितले की, तुमच्या जमिनी गेल्या म्हणता आणि बाराबलुतेदारांकडे जमिनी तरी आहेत का? सातबारा तरी आहे का? जरांगे तू या लोकसभेला पंकजा मुंडेंना पाडण्यासाठी बैठका घेतल्या. गेल्या 78 वर्षात धनगरांचा एकही खासदार झाला नाही, तरी त्या महादेव जानकर यांचा पराभव करण्यासाठी तू बैठका घेतल्या. प्रकाश आंबेडकर आनंदराज आंबेडकर यांना तुझे मत झाले नाही. भंपक माणसाच्या मागे जनता कशाला जाईल काय योगदान आहे त्यांचं? अशी विचारणा त्यांनी केली. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here