सोलापूर जिल्हा ग्रामीण कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ, 232 जणांनी केली कोरोनावर मात

0

सोलापूर,दि.20: सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या (Corona Cases In Solapur) दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्ण संख्या पुन्हा वाढत आहे. तिसऱ्या लाटेतील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 566 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 178281 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 172498 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 2101 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3682 झाली आहे. यात 2392 पुरुष व 1290 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 2084 अहवाल प्राप्त झाले. यात 1518 निगेटिव्ह तर 566 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 344 पुरुष आणि 222 महिलांचा समावेश आहे. आज 1 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 232 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

हेही वाचा Viral Photo: सांगा या फोटोत किती हत्ती दिसत आहेत? अनेकजण गेले गोंधळून


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here