या शहरात सुरू झाली लाडकी सुनबाई योजना, या आहेत अटी

0

सोलापूर,दि.7: सोशल मिडीयावर अनेक मजेशीर पोस्ट व्हायरल होतात. अनेकदा या पोस्टमधून सामाजिक संदेश दिला जातो. राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्य सरकार पात्र महिलांना महिन्याला 1500 रूपये देणार आहे. सध्या सोशल मिडीयावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. एका हॅाटेलची जाहिरात व्हायरल झाली आहे. या जाहिरातीचा मजकुर वाचून अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

लाडकी सुनबाई

बारामतीमधील एका हॉटेल चालकाने भन्नाट योजना राबवली आहे. याची चर्चा होत आहे. या हॉटेल चालकाने लाडकी सुनबाई ही योजना सुरू केली आहे. या योजनेत सुनबाईंना मोफत जेवण दिलं जाणार आहे. याचा फायदा सासुबाईंनाही होणार आहे. सासूबाईच्या जेवणावर सुनबाईला मोफत जेवण दिलं जाणार आहे. सध्या या हॉटेल चालकाकडून संपूर्ण बारामती शहरातून याची जाहिरात बाजी केली जात आहे. सोशल मीडियावर या पोस्टरची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. 

बारामतीतल्या भिगवन रोडवरच्या हॉटेल राजवाडा पार्क या हॉटेलने ही भन्नाट आयडीया शोधून काढली आहे. या हॉटेलने काही पोस्टर्स छापले असून ते बारामतीतील रिक्षांवर लावून जाहीरात केली जात आहे. मोफत जेवणासाठी हॉटेलने तीन अटी ठेवल्या आहेत. 

1 – यातली पहिली अट म्हणजे सासुबाईंना जेवायला घेऊन येणे आवश्यक आहे. 

2 – सासूबाईंना जी थाळी देणार तीच थाळी सुनबाईला फ्री मिळणार.

3 – घरातील  कमीत कमी पाच लोकांना जेवायला येणं अनिवार्य


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here