सोलापूर,दि.26: Kumar Ashirwad On Surat Chennai Highway: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या समन्वयामुळे सुरत चेन्नई महामार्गाकरिता मोजणी करण्यात आली आहे. सुरत चेन्नई महामार्गामधील (Surat Chennai Highway) ट्रम्पेट अंतर्गत बार्शी येथील वैराग गावातील मोजणी प्रक्रिया गेल्या सहा महिन्यापासून म्हणजे आजतागायत 7 वेळा प्रयत्न करूनही प्रलंबित होती. वैराग येथील नगरपंचायत प्रमाणे जमिनीस दर मिळावा अन्यथा मोजणीच होऊ देणार नाही, अशी येथील शेतकऱ्यांची मागणी होती.
याबाबत सदर शेतकऱ्यांनी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांना देखील भेटून बाजू मांडली होती. नगरपंचायत प्रमाणे चौ.मी. वर दर मिळविण्यासाठी आमदार महोदयांनी मागील आठवडयात जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक देखील घेतली होती. तरी देखील शेतकऱ्यांनी याबाबत पाठपूरावा करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून मोजणीस विरोध केली होता. मात्र 7 ऑक्टोबर पूर्वी मोजणी पूर्ण न झाल्यास संपूर्ण प्रकल्पाचे नूकसान होईल ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी प्रत्यक्ष संबधीत शेतकऱ्यांना भेटून वैयक्तीक सुसंवाद साधला. आणि हा प्रयत्न यशस्वी झाला नगरपंरचायत प्रमाणे चौ.मी. प्रमाणे दर मिळवण्यासाठी मी स्वत: लक्ष घालून पाठपूरावा करून घेईन असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना देऊन त्यांना विश्वासात घेतले.
सुरत चेन्नई महामार्गाकरिता मोजणी पूर्ण | Kumar Ashirwad On Surat Chennai Highway
वैराग येथे मोठयाप्रमाणात विरोध झाल्यास नियमानुसार पोलिस बंदोबस्तात मोजणी करण्याचे अधिकार असतानाही जिल्हाधिकाऱ्यांनी सुसंवादाने शेतकऱ्यांचे मन जिंकून परिस्थिती हाताळली व वैराग येथील मोजणी पूर्ण करून घेतली. यारूपाने सुरत चेन्नई महामार्ग अंतर्गत येणाऱ्या ग्रीनफिल्ड, रिंग रोड व ट्रम्पेट अशा तिन्ही विभांगाची एकुण 58 गावांची संपूर्ण मोजणी प्रक्रिया झाली आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांनी समन्वायाने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन मोजणीची प्रक्रिया पार पाडल्यामुळे संबंधीत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी भूसंपादन अभिजीत पाटील यांनी दिली आहे.