मुंबई,दि.3: भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या (kirit somaiya) हे राज्य सरकारमधील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत त्या संदर्भात पुरावे सादर करण्यात आल्याचे सांगतात. किरीट सोमय्या यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. एवढंच नाहीतर 1000 कोटींची संपत्ती जप्त केल्याचा दावाही केली. पण, त्यांचा हा फटाका पार फुसका निघाला आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधीत काही संपत्तीवर आयकर विभागाने एकूण 1000 कोटी रुपयांची ही संपत्ती जप्त करण्याच्या संदर्भात नोटीस बजावली असं वृत्त समोर आले होते. परंतु, कोणत्याही संपत्तीवर टाच किंवा त्यासंदर्भातील नोटीसही आली नाही. प्रसार माध्यमांमध्ये पेरलेले वृत्त निराधार, वस्तुस्थितीशी विसंगत, खोडसाळपणाने प्रेरित आहे, असा खुलासा अजित पवारांकडून करण्यात आला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित कोणत्याही संपत्तीवर आयकर विभागाने टाच आणलेली नाही किंवा त्यासंदर्भातील कोणतीही नोटीस अजित पवार यांना प्राप्त झालेली नाही. यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमात येत असलेले वृत्त निराधार, वस्तुस्थितीशी विसंगत, खोडसाळपणाचे आहे, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वकील ॲड. प्रशांत पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.
अजित पवार यांच्यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांमध्ये प्रसारीत होत असलेल्या बातम्यांचे खंडन करताना त्यांचे वकील ॲड. प्रशांत पाटील म्हणाले की, ‘अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच आलेली नाही किंवा त्यासंदर्भात नोटीसही बजावण्यात आलेली नाही. आयकर विभागाकडून काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. त्या पत्राला योग्य ते उत्तर देण्यात येईल. प्रशासकीय आणि कायदेशीर मार्गाने योग्य ती कार्यवाही केली जाईल, असंही अजित पवार यांच्या वकिलांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.