Kirit Somaiya: हसन मुश्रीफांचं काउंटडाऊन सुरू, किरीट सोमय्या यांनी सांगितले त्यानंतर कुणाचा नंबर

0

मुंबई,दि.11: Kirit Somaiya On Hasan Mushrif: राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यासोबतच ग्रामविकास खात्याचे सचिव राजेश कुमार मिना यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. एकूण 158 कोटींचा घोटाळा हसन मुश्रीफ यांनी केल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी बोलताना केला आहे. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना त्यांनी मुश्रीफांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही किरीट सोमय्यांनी केला आहे.

सर्व घोटाळे इंटरलिंक आहेत | Kirit Somaiya

विविध साखर कारखान्यांमध्ये घोटाळे झाले आहेत आणि ते सर्व घोटाळे इंटरलिंक आहेत, असं किरीट सोमय्यांचं म्हणणं आहे. केवळ हसन मुश्रीफच नाही अनिल परबही आहे आणि त्यानंतर अस्लम शेख यांचा नंबर लागेल, अशीही स्पष्टोक्ती किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे.

Kirit Somaiya On Hasan Mushrif
किरीट सोमय्या

हसन मुश्रीफ यांनी स्वतःच्या… | Kirit Somaiya On Hasan Mushrif

किरीट सोमय्या बोलताना म्हणाले की, “ठाकरे यांच्या माफिया सरकारमधील आणखी एक मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आता ईडीची कारवाई सुरू झाली. 158 कोटी रुपये हसन मुश्रीफ यांनी स्वतःच्या कुटुंबीयांच्या, मुलाच्या आणि जावयाच्या कंपनीच्या नावानं घोटाळ्याचे पैसे कोलकात्याच्या अनेक बोगस कंपन्यांमधून स्वतःच्या कुटुंबीयांच्या कंपनीत घेतले. त्यानंतर ते पैसे सर सेनापती घोरपडे साखर कारखान्यात ट्रान्सफर केले.”

हसन मुश्रीफचं काउंटडाऊन सुरू

“कोल्हापुरातील आई महालक्ष्मी मला आज पावली. मला आठवतंय 28 सप्टेंबर रोजी मी कोल्हापुरात जायला निघालो होतो आणि त्यावेळी हसन मुश्रीफ, तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरेंनी मला कोल्हापुरला जाऊ दिलं नाही. पण आज महालक्ष्मीनं आशीर्वाद दिला. हसन मुश्रीफचं काउंटडाऊन सुरू झालं आहे. मी दोन उदाहरणं देतो रजत कंज्युमर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून हसन मुश्रीफ कुटुंबीयांच्या खात्यात 13 कोटी 85 लाख रुपये आले. हे पैसे आले 2013-14 मध्ये. पण ती कंपनी 2004 मध्येच बंद झाली होती. पण ती कंपनी 2004 मध्येच बंद झाली होती. जी कंपनी अस्तित्वातच नाही, तिथून ते मुश्रीफ कुटुंबीयांच्या खात्यात येतात. तिथून ते साखर कारखान्याच्या खात्यात जातात. माऊंट कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड 24 कोटी 75 लाख रुपये, ही कंपनीही कधीच बंद झालेली, याच कंपनीच्या नावानं बँक अकाउंट उघडण्यात आलं. हसन मुश्रीफ रोख पैसे देतात. त्याच पैशाचा चेक बनवून कुटुंबीयांच्या खात्यात जमा होता.” , असा आरोप सोमय्यांनी बोलताना केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here