Kiren Rijiju Removed: किरेन रिजिजूंना कायदा मंत्रिपदावरून हटविले, मोदी सरकारचा मोठा निर्णय

0

नवी दिल्ली,दि.१८: Kiren Rijiju Removed: किरेन रिजिजूंना कायदा मंत्रिपदावरून हटविले आहे. मोदी कॅबिनेटमध्ये मोठा बदल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून न्यायव्यवस्था, सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांचे कायदा मंत्रिपद काढून घेण्यात आले आहे. त्यांच्याजागी अर्जुन राम मेघवाल यांना कायदा मंत्री बनविण्यात आले आहे. यानंतर आता रिजिजू यांच्याकडे पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Kiren Rijiju Removed | किरेन रिजिजू

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सल्ल्याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंत्रिमंडळ बदलाला मंजुरी दिली आहे. किरेन रिजिजू यांना कायदा मंत्रालयाऐवजी आता भू विज्ञान मंत्रालय देण्यात आले आहे. मेघवाल यांच्याकडे त्यांची खाती आहेतच शिवाय कायदा आणि न्याय मंत्रालयाचा राज्य मंत्री म्हणून स्वतंत्र प्रभारही देण्यात आला आहे. 

जुलै २०२१ मध्ये रवीशंकर प्रसाद यांच्या जागेवर किरेन रिजिजू यांची केंद्रीय कायदेमंत्री म्हणून नियुक्ती झाली होती. यानंतर किरेन रिजिजू यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या कोलॅजियम सिस्टमवर केलेल्या वक्तव्यांमुळे ते चर्चेत राहिले.

रिजिजू हे अरुणाचल पश्चिम लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. त्यांच्याकडे दिल्ली विद्यापीठाची कायद्याची पदवी आहे. त्यांनी २००४ मध्ये पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढविली होती. तेव्हा जिंकले होते. परंतू, २००९ मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. २०१४ मध्ये पुन्हा निवडून येत मोदींच्या मंत्रिमंडळात ते गृह राज्य मंत्री बनले होते.

रिजिजू गेल्या काही काळापासून न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. गेल्या वर्षी सात नोव्हेंबरला त्यांनी न्यायाधीशांच्या नियुक्तीवरून सर्वोच्च न्यायालयाचे कॉलेजिअम सिस्टिम संविधानासाठी एलियन असल्याचे म्हटले होते. क़ॉलेजिअम सिस्टिममध्ये त्रुटी आहेत आणि लोक त्यावर आवाज उठवत आहेत. यानंतर त्यांनी निवृत्त जज आणि ॲक्टिव्हिस्ट हे भारत विरोधी संघटना आहेत, असे ते म्हणाले होते. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here