सोलापूर,दि.३०: बाळीवेस येथील श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाच्या सन २०२६-२७ च्या उत्सव समिती अध्यक्षपदी जगदीश हिरेहब्बू यांची, तर उपाध्यक्षपदी सुभाष गुंदगी, शिवानंद सोन्ना व अजय येळमेली आणि सचिवपदी पुष्कराज मेत्री यांची एकमताने निवड करण्यात आली.
मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड झाली. श्री मंदिरात पार पडलेल्या या सभेच्या प्रारंभी मंडळाचे विश्वस्त व खजिनदार केदार मेंगाणे यांनी वार्षिक कामकाजाचा अहवाल सादर केला.
सभेचे स्वागत व सूत्रसंचालन ट्रस्टी सचिव मल्लिनाथ खुने यांनी केले. यावेळी मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, “श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाला मोठी ऐतिहासिक व धार्मिक परंपरा लाभली आहे. गणेशोत्सवाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविण्याची मंडळाची परंपरा आहे. शांततापूर्ण व शिस्तबद्ध मिरवणूक आणि समाजोपयोगी कार्यामुळे मंडळाने सोलापूरकरांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. यंदाही ही परंपरा अधिक भक्कम करत भक्तिमय, शिस्तबद्ध आणि सामाजिक संदेश देणारा गणेशोत्सव साजरा केला जाईल.”
नूतन उत्सव समिती अध्यक्ष जगदीश हिरेहब्बू यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “मंडळाची ऐतिहासिक परंपरा आणि सामाजिक बांधिलकी कायम ठेवत यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येईल. नाविन्यपूर्ण मिरवणूक आणि विविध सामाजिक उपक्रमांचे नियोजन करण्यात येत असून उत्सव काळात सर्वांनी शिस्त, शांतता व सामाजिक सलोखा राखण्यासाठी सहकार्य करावे.”
यावेळी नूतन अध्यक्ष जगदीश हिरेहब्बू यांच्या हस्ते श्रींची महाआरती करण्यात आली. तसेच माजी उत्सव अध्यक्ष बाळासाहेब मुस्तारे यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष जगदीश हिरेहब्बू यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे, ट्रस्टी उपाध्यक्ष प्रकाश वाले, ट्रस्टी सचिव मल्लिनाथ खुने, ट्रस्टी खजिनदार केदार मेंगाणे यांच्यासह विश्वस्त मल्लिनाथ मसरे, गुरुलिंग समाणे, शिवशंकर कोळकूर, शिवानंद बुगडे, सुधीर थोबडे, नागनाथ मेंगाणे, शशिकांत बिराजदार, शिवराय समाणे, लक्ष्मण भाईकट्टी, प्रवीण वाले, शिवलिंग माळगे, विकास धुम्मा, सचिन गुंगे, गुरुशांत मोकाशी, अमर चव्हाण, संजय बिराजदार आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कसबा गणपती नूतन पदाधिकारी (२०२६-२७)
उत्सव अध्यक्ष: जगदीश हिरेहब्बू
उपाध्यक्ष: सुभाष (मामा) गुंदगी, शिवानंद सोन्ना, अजय येळमेली
सचिव: पुष्कराज मेत्री
खजिनदार: केदार मेंगाणे
मिरवणूक प्रमुख: सोमनाथ मेंगाणे, अनिल मसरे, अमित गुंगे, योगीराज भोगडे, प्रशांत धुम्मा
लेझिम प्रमुख: कैलास मेंगाणे, महेश बुगडे, केतन भोगडे, कृष्णा सुरेराव, योगेश हदरे








