Karnataka: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील या राज्याने घेतला हा निर्णय

Karnataka: कर्नाटक सरकारनं मास्कसक्ती (Mask Mandatory) केली आहे

0

बंगळुरु,दि.26: Karnataka News: कोरोनाने (Covid-19) चीनसह अनेक देशात कहर केल्याचे वृत्त येत आहे. कोरोनाचा (Corona) संभाव्य धोका लक्षात घेता कर्नाटक सरकारनं (Karnataka Government) शाळा, कॉलेज, सिनेमागृह पब आणि बारमध्ये मास्कसक्ती (Mask Mandatory) केली आहे. कोरोना विषाणूचा धोका पाहता खबरदारी म्हणून कर्नाटकमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्कसक्ती करण्यात आली आहे. (Karnataka Covid Guidelines) वर्षाअखेर आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिक गर्दी करत आहेत. त्यापार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारनं मास्कसक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठीही नियमावली जारी | Karnataka Covid Guidelines

तसंच नवीन वर्षाच्या स्वागतासाठीही नियमावली जारी करण्यात आलीय. चीनमध्ये कोरोना रूग्णांची संख्या झपाट्यानं वाढतेय. नव्या व्हेरियंटवरून आरोग्य मंत्रालयानेही सर्व राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कर्नाटक सरकारनं शाळांमध्ये मास्क घालणं तसच सॅनिटायझरचा (Sanitizer) वापर बंधनकारक केलाय. याशिवाय लसीकरणासाठीही (Vaccination) कडक पावलं उचलण्यात आलीयेत. ज्यांनी दोन डोस घेतले आहेत. त्यांनाच सिनेमागृह, पबमध्ये प्रवेश दिला जाईल असं कर्नाटक सरकारने जाहीर केलंय.

Karnataka News

कर्नाटक आरोग्य विभागाची तातडीची बैठक | Karnataka News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने नविन गाईडलाईन्स (Karnataka Covid Guidlines) जारी केली आहे. कर्नाटक आरोग्य विभागाने राजधानी बंगळुरुमध्ये तातडीची बैठक घेतली. या बैठकीनंतर कर्नाटक सरकारने परदेशातून आलेल्या प्रवाशांसाठी बंगळुरु आणि मंगळुरुमध्ये दोन रुग्णालयं सर्व सुविधांनी युक्त करण्यास सांगतिलं आहे. या रुग्णालयात परदेशातून आलेल्या नागरिकांची टेस्टिंग केली जाणार आहे. याशिवाय बंद थिएटरमध्ये मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. शाळा-कॉलेजमध्येही मास्क सक्ती असणार आहे.

शाळा-कॉलेजवर कारवाई होऊ शकते

शाळा-कॉलेजमध्ये सॅनिटायझरची व्यवस्था करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांच्या लसीकरणं होणं गरजेचं आहे. कोणत्याही शाळा किंवा कॉलेजमध्ये लसीकरण न झालेला विद्यार्थी आढळला तर त्या शाळा-कॉलेजवर कारवाई होऊ शकते. नव वर्ष स्वागतच्या पार्श्वभूमीवर रेस्टॉरंटमध्ये मास्क सक्ती करण्यात आली आहे. इतकंच नाही तर 31 पार्टीला केवळ 1 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, देशात आज 196 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर मागील 24 तासांत एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली असली तरी खबरदारी घेतली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक मंदिरात मास्कसक्ती करण्यात आली आहे. कोरोना नियमांचं पालन करत नवीन वर्षाचं स्वागत करा, असे आवाहन सरकारकडून केले जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here