भाजपाचे पुन्हा एकदा ‘ऑपरेशन लोटस’; काँग्रेस आमदाराचा दावा

0

बेंगलूरू,दि.25: भाजपाने पुन्हा एकदा ‘ऑपरेशन लोटस’ची  तयारी सुरू केल्याचा दावा काँग्रेस आमदाराने केला आहे. कर्नाटक राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. भाजपाने यापूर्वीच कर्नाटकात ऑपरेशन लोटसची सुरूवात केली होती, मात्र त्यात यश आले नसल्याचा दावा विरोधी पक्षाकडून करण्यात येत होता. मात्र आता पुन्हा एकदा भाजपाने काँग्रेसचे कर्नाटकातील सरकार पाडण्यासाठी तयारी केली आहे. 

आता पुन्हा भाजपकडून ऑपरेशन लोटस कर्नाटकात सुरू असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसने केला आहे. काँग्रेस आमदार रविकुमार गौडा यांनी रविवारी याबाबत भाजपवर खळबळजनक आरोप केले. कर्नाटकात भाजपने पुन्हा एकदा ‘ऑपरेशन लोटस’च्या तयारीला सुरुवात केली आहे, असा दावा त्यांनी केला आहे. याआधीही भाजपने असा प्रयत्न केला होता. मात्र, राज्यातील काँग्रेसचे सरकार मजबूत आहे.

आता भाजपने आमदारांची किंमत दुपटीने वाढवून आमदार विकत घेण्यासाठी भाजप 100 कोटी द्यायला तयार असल्याचा आरोपही गौडा यांनी केला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे सरकार अस्थिर करून सत्तास्थापनेसाठी भाजप 100 कोटी रुपयांची ऑफर देत काँग्रेस आमदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, आमच्या पक्षातील एकही आमदार भाजपच्या जाळ्यात अडकणार नाही, असा विश्वास व्यक्त करत कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार स्थिर आणि मजबूत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

याआधीचा प्रयत्न फसल्याने आता भाजपने 50 कोटी रुपयांची ऑफर वाढवून 100 कोटी रुपये केली आहे. त्यांना 50 आमदार खरेदी करायचे आहेत. याबाबत मलाही कुणीतरी फोन केला होता, मी त्याला म्हणालो 100 कोटी रुपये तुमच्याकडेच ठेवा. आमचे सरकार मजबूत आहे. भाजपकडून सातत्याने आमचे सरकार पाडण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, त्यात त्यांना यश मिळणार नाही, असा विश्वासही गौडा यांनी व्यक्त केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here