Karnataka Hijab Row: कर्नाटकातील हिजाबचा वाद (Karnataka Hijab Controversy) थांबण्याचे नाव घेत नाही आहे. मांड्याच्या शाळेतून हे ताजे प्रकरण समोर आले आहे. शाळेबाहेर हिजाब घालण्यावरून पालक आणि शिक्षक यांच्यात जोरदार वादावादी झाली. प्रत्यक्षात येथील एका सरकारी अनुदानित शाळेतील विद्यार्थिनीला शाळेच्या आवारात प्रवेश करण्यापूर्वी तिचा हिजाब काढण्यास सांगण्यात आले.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शाळेतील शिक्षकांनी हे पाऊल उचलल्याचे समजते. गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने अंतरिम आदेशात म्हटले होते की, शैक्षणिक संस्था पुन्हा सुरू होऊ शकतात, परंतु धर्माशी संबंधित कपड्यांना परवानगी दिली जाणार नाही. हिजाब घालण्यावरून शिक्षक आणि पालकांमध्ये जोरदार वादावादी झाली. हिजाबबाबत शिक्षक सांगतात की, विद्यार्थिनीला शाळेत येण्यापूर्वी तिचा हिजाब काढावा लागणार.
तर, या प्रकरणी एका पालकाने सांगितले की, विद्यार्थिनीला वर्गात गेल्यावर हिजाब काढण्यास सांगितले जाऊ शकते. पण हे लोक हिजाब घालून शाळेत येऊ देत नाहीत. हिजाबच्या वादात आजपासून कर्नाटकात दहावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत.