Karnataka Election Result: कर्नाटक कुणाचे: कर्नाटकमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी

0

बेंगळुरू,दि.13: Karnataka Election Result: कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांचा निकाल आज लागणार असून भाजपा आणि काँग्रेस यांच्यात मोठी चुरस पाहायला मिळत आहे. कर्नाटक विधानसभेचे कल हाती येत आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसनं (Congress) जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र दिसत आहे. बहुतमाचा आकडा पार करुन काँग्रेस 135 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप 70 जागांवर आघाडीवर आहे. काही ठिकाणी मात्र, भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे बेळगावमध्येही काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत.

कर्नाटकच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्वाचा आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Election Result) मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे काही कल हाती आले आहेत. जवळपास 200 हून अधिक जागांचे कल हाती आले आहेत. यामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. विशेष म्हणजे बेळगावमधील 18 जागांपैकी 14 जागांवर काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तर भाजप चार जागांवर आघाडीवर आहे. बेळगावमध्ये काँग्रेसला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. कल सारखे कमी जास्त होत आहेत. मात्र, सध्या मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस आघाडीवर असून भाजप पिछाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.

कर्नाटक कुणाचे: कर्नाटकातील निवडणुकीसाठी 72.67 टक्के मतदारांनी | Karnataka Election Result

कर्नाटकातील 224 जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक झाली. कर्नाटकातील निवडणुकीसाठी 72.67 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी सुमारे महिनाभर प्रचार केल्यानंतर आता राज्यातील जनता सत्तेच्या चाव्या कुणाकडे देणार आज ठरणार आहे. भाजप सत्ता कायम ठेवणार की काँग्रेस सत्तेत येणार हे अवघ्या काही तासांमध्ये ठरणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here