Shivsena Crisis: ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांचा मोठा दावा; निवडणूक आयोगासमोर सुनावणी

0

मुंबई,दि.20: Shivsena Crisis: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत फूट पडली. शिवसेनेचे 40 आमदार व 13 खासदार शिंदे गटात गेले. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेत दोन गट पडले आहेत. आता दोन्ही गटांनी शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी आता सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे, तर दुसरीकडे धनुष्यबाण चिन्हासाठीही दोन्ही गटांनी दावा केला आहे. या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, आज सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी पक्षप्रमुखपदासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. (Kapil Sibal On Shivsena Crisis)

काय म्हणाले कपिल सिब्बल? Kapil Sibal On Shivsena Crisis

धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेच्या ठाकरे गटाचा की, शिंदे गटाचा यावरून निवडणूक आयोगासमोर (Election Commission) सुनावणी सुरू झाली आहे. सुनावणीवेळी कपिल सिब्बल म्हणाले, ‘घटनेनुसार शिंदे गटाची प्रतिनिधी सभा नाही, राष्ट्रीय कार्यकारणीला मुदवाढ द्या अथवा निवडणूक घ्या, अशी मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केली आहे. 

हेही वाचा Deepak Sawant: माजी मंत्री दीपक सावंत यांच्या गाडीला अपघात; डंपरची कारला धडक

Shivsena Crisis
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे

सुनावणी दोन्ही गटांसाठी अत्यंत महत्त्वाची | Shivsena Crisis

केंद्रीय निवडणूक आयोगासमोर महत्त्वाची सुनावणी सुरु आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरतं गोठवलं आणि ठाकरेंना मशाल तर शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह दिलं. त्यानंतर धनुष्यबाण या शिवसेनेच्या मूळ चिन्हावर दोन्ही गटांनी दावा केला. त्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत येत्या 23 जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे आजची सुनावणी दोन्ही गटांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ठाकरे गटाच्या वतीनं आतापर्यंत कपिल सिब्बल यांनी ठामपणे युक्तीवाद केला आहे.

यावेळी कपिल सिब्बल यांनी विधीमंडळ आणि राजकीय पक्षाची तुलना केली. विधीमंडळ पक्षातील संख्याबळाची निवडणूक आयोगासमोर माहिती दिली. घटनेनुसार प्रतिनिधी सभा आमच्याकडेच आहे, असा युक्तिवादही कपिल सिब्बल यांनी केला आहे. 

शिवसेना फुटीचा पक्षावर कोणताही परिणाम झालेला नाही

सुरुवातीला ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी आयोगासमोर युक्तिवाद केला. कपिल सिब्बल म्हणाले, शिवसेनेतील फूट कपोकल्पित आहे. शिंदे गट हे वास्तव नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनाच खरी शिवसेना आहे. शिवसेनेत फूट झालेली नाही. जे आमदार बाहेर पडले आहेत ते त्यांच्या इच्छेने बाहेर पडले आहेत. पक्षातून बाहेर पडले ते वेगळ्या गटाचे आहेत. शिंदे गट हा शिवसेना नाही. शिवसेना फुटीचा पक्षावर कोणताही परिणाम झालेला नाही. ही फूट ग्राह्य धरु नये. ती काल्पनिक असू शकते. कपिल सिब्बल यांनी पक्षाची घटना वाचायला सुरुवात केली.

शिंदे गटाच्या याचिकेतील मुद्दे खोडण्याचा कपिल सिब्बल यांच्याकडून प्रयत्न, जर यांचं बंड झालं होतं तर एक महिना आयोगाकडे येण्यासाठी का लावला?

राष्ट्रीय कार्यकारिणी आमच्यासोबत आहे, शिंदे गटाची राष्ट्रीय कार्यकारिणी बेकायदेशीर

ठाकरे गटाची कार्यकारिणी बरखास्त होऊ शकत नाही. ठाकरेंची कार्यकारिणी घटनेप्रमाणे आहे.

एकनाथ शिंदेंचं प्रतिज्ञापत्र तपासून पाहा. आम्हाला प्रतिनिधी सभा घेण्याची परवानगी द्या. दोन्ही ठिकाणी आमचं संख्याबळ जास्त, सभागृहांमध्येही आमचं स्थान आहे

पक्षप्रमुख पदाला मुदतवाढ द्या, ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी, घटनेनुसार प्रतिनिधी सभा आमच्याकडे, शिंदे गटाकडे प्रतिनिधी सभा नाही, जी आहे ती घटनाबाह्य.

शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये कमतरता, 61 पैकी 28 जिल्हाप्रमुखांची प्रतिज्ञापत्र नाहीत

लोकशाहीनुसार म्हणणं मांडायला हवं होतं, गुवाहाटीला का गेले? पक्षाच्या सभेला उपस्थिती न लावता ते गुवाहाटीला गेले, एकनाथ शिंदे आधी शिवसेनेत होते आणि ते कार्यरत होते.

राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटानं कोणती कागदपत्रं सादर केली आहेत का? शिंदे गट राजकीय पक्ष नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here