केवळ भाषण दिल्यानं फेसबुकवर गोड गोड बोलून मतं मिळत नाहीत: आमदार बच्चू कडू

आमदार बच्चू कडू यांनी राज ठाकरे आणि उध्दव ठाकरेंवर टीका केली आहे

0

अमरावती,दि.14: केवळ भाषण दिल्यानं फेसबुकवर गोड गोड बोलून मतं मिळत नाहीत असे म्हणत आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली. केवळ भाषण दिल्यानं मते मिळत नाहीत असं म्हणत आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी राज ठाकरेंवर टीका केली. तर फेसबुकवर गोड गोड बोलून मतं मिळत नाहीत, असा टोला बच्चू कडूंनी उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरेंना (Aaditya Thackeray) लगावला. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिंपळखुटा येथे आयोजित कार्यक्रमात बच्चू कडू बोलत होते. यावेळी त्यांनी राज ठाकरेंसह उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीका केली.

केवळ बोलण्यानं मते मिळत नसतात: आमदार बच्चू कडू

जात आणि धर्म लावला तर पक्ष वाढवायला वेळ लागत नाही. सहज पक्ष वाढतो असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले. आपण मनसे पाहिला असेल, ते मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा असे म्हणायचे. केवळ बोलण्यानं मते मिळत नसतात असे कडू म्हणाले. मनसेच्या 13 आमदारांना महाराष्ट्र आता विसरुन गेला असल्याचे बच्चू कडू म्हणाले. मी चार वेळा निवडून आलो आहे. जातीचं सोंग नाही, जातीचा झेंडा नाही, धर्माचा झेंडा नाही, कोणताही नेता बोलावला नाही. तुमच्यासारख्या सामान्य माणसांनी देशात इतिहास केला. अपक्ष माणूस एकदा नाहीतर चार वेळा निवडून दिला असल्याचे कडू म्हणाले. माझं काम बघूनच तुम्ही मला निवडून दिल्याचे कडू म्हणाले.

आमदार बच्चू कडू

माझ्यावर 350 गुन्हे दाखल

ज्याला हात नाही, पाय नाही, डोळे नाही, ज्याला ऐकू येत नाही त्यांच्यासाठी मी महाराष्ट्रभर फिरलो आहे. या सर्व वेदना विधानसभेत मी मांडल्या आहेत माझ्यावर 350 गुन्हे दाखल झाले असल्याचे बच्चू कडू यावेळी म्हणाले. राज ठाकरेंना, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना विचार बर किती गुन्हे दाखल आहेत? असा सवालही बच्चू कडूंनी या सभेत बोलताना केला. फक्त फेसबूकवर गोड गोड बोलून मतं मिळत नाही असेही ते म्हणाले. बोल बच्चन करुन काही होत नाही. कर्म, कर्तव्य करणं गरजेचं आहे. कष्ट करावं लागते असेही कडू म्हणाले. जात आणि धर्म लावला तर पक्ष वाढवायला वेळ लागत नाही. पक्ष सहज पक्ष वाढतो असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here