सोलापूर,दि.२९ : सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढ भागात आणि जुळे सोलापूर परिसरातील नागरी सुविधांसाठी सुसज्ज दवाखाना आणि प्रसुतीगृह, नवे सुसज्ज बसस्थानक, नाट्यगृह आणि महापालिकेची इंग्रजी माध्यम शाळा, महात्मा बसवेश्वर उद्यान, अद्यावत भाजी मंडई या सर्व उपक्रमांसाठी सोईच्या जागेचे आरक्षण ठेवून आगामी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन आणि दावे हरकती सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांना सादर केले.
जुळे सोलापूर विकास आराखडा प्राधिकरण समिती आणि विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने नेहरू नगर पासून मोर्चा काढून घोषणा देत सर्वपक्षीय नेते, समाजसेवक, ज्येष्ठ नागरिक आणि नागरिकांनी सादर केले.
माजी आमदार व शिवसेना नेते शिवशरण पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॅा. बसवराज बगले, भाजपा नेते माजी नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, काँग्रेसचे नेते विजय शाबादी व परिवहनचे माजी सभापती सुभाष चव्हाण, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आणप्पा सतूबर, प्रा.विलास मोरे, सुभाष उळागडे, बाळासाहेब पाटील, महेश पाटील, पांडुरंग पवार, विश्वनाथ आमणे, अशोक पाटील, शैलेश आमणगी, वैशाली माशाळ, सुजाता म्हेत्रे, सुरेखा गब्बूर, बाबूराव लददे, ताराचंद नाईक, सिद्राया माविनमर, संतोष कदम,पद्माकर कुलकर्णी कुसगल आदि प्रमुख मंडळींनी या मोर्चाचे नेतृत्व केले.