सोलापूर,दि.28: Job Fair: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांच्यामार्फत दिनांक 03 मार्च रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. सोलापूर जिल्ह्यातील नोकरीइच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा मेळावा आयोजित केला असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी दिली.
या रोजगार मेळाव्यात 10 वी, 12 वी, ट्रेनी, आय.टी.आय. वेल्डर, फिटर, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, ऑफिस असिस्टंट,कोणतीही पदवी, टेलिकॉलर, इलेक्ट्रीशियन अशा प्रकारची एकुण 800 पेक्षा जास्त रिक्तपदांसाठी 5 उद्योजकांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अधिसुचीत केलेली आहेत.
नोकरी इच्छुक उमेदवारांनी सदर संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत, जेणेकरून त्यांना मेळाव्यात सहभागी होता येईल. याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाच्या 0217-2950956 या दूरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थ कोट, पार्क चौक, सोलापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त जाधव यांनी केले आहे.