J&K: दहशतवाद्यांनी सतीश सिंह यांना गोळ्या घालून मारले ठार, काश्मीर सोडण्याची धमकी देणारे पोस्टर आले लावण्यात

0

दि.14: J&K: बुधवारी संध्याकाळी दक्षिण काश्मीरच्या (J&K) कुलगाम जिल्ह्यातील काकरन भागात दहशतवाद्यांनी एका व्यक्तीला गोळ्या घातल्या, ज्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सतीश सिंह राजपूत असे या व्यक्तीचे नाव आहे.

दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील काकरन भागात दहशतवाद्यांनी एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या केली. बुधवारी संध्याकाळी ते दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी झाले होते, रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सतीश सिंह राजपूत असे या व्यक्तीचे नाव असून ते काकरान कुलगाम येथील रहिवासी आहे.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, संशयित अतिरेक्यांनी काकरन येथे एका अल्पसंख्याक हिंदू व्यक्तीवर गोळ्या झाडल्या, ज्याचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. हल्लेखोरांना पकडण्यासाठी परिसराची नाकेबंदी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या हत्येची जबाबदारी दहशतवादी संघटनेने घेतली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीर फ्रीडम फायटर्स नावाच्या दहशतवादी संघटनेने हत्येची जबाबदारी घेतली आहे. सतीश सिंह हे व्यवसायाने ड्रायव्हर होते.

कुलगाममध्ये धमकीचे पोस्टर आले समोर

बुधवारी, कुलगाम जिल्ह्यात पोस्टर लावण्यात आले ज्यामध्ये अज्ञात दहशतवादी संघटनेने गैर-स्थानिकांना खोऱ्यातून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. काश्मिरी पंडितांना खोरे सोडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ओमर अब्दुल्ला यांनी केला या हल्ल्याचा निषेध

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सतीश सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत हल्ल्याचा निषेध केला. असे हल्ले कधीही समर्थनीय ठरू शकत नाहीत, असे ते म्हणाले.

या वर्षात आतापर्यंत 49 दहशतवादी मारले गेले

मिळालेल्या माहितीनुसार, 1 जानेवारीपासून जम्मू-काश्मीरमध्ये 49 दहशतवादी मारले गेले आहेत. याशिवाय 71 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्याचवेळी 3 दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. एप्रिलमध्येच कारवाईदरम्यान 8 दहशतवादी मारले गेले आणि 10 जणांना अटक करण्यात आली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here