Jitendra Awhad News: जितेंद्र आव्हाडांचं छत्रपती संभाजी महाराजांवरून खळबळजनक ट्वीट

Jitendra Awhad News: जितेंद्र आव्हाड यांनी खळबळजनक केले ट्विट

0

मुंबई,दि.२: राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) छत्रपती संभाजी महाराजांवरून खळबळजनक ट्वीट (Jitendra Awhad Tweet) केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानामुळे वादाला तोंड फुटलं आहे. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, ते स्वराज्य रक्षक होते, असं विधान अजित पवारांनी केलं. अजित पवारांच्या या विधानानंतर महाराष्ट्रातील वातावरण तापलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांचे आव्हान | Jitendra Awhad News

अजित पवार यांनी माफी मागावी, अशी मागणी करणार्‍या भाजपच्या लोकांनी सावरकर आणि गोळवलकर चुकले आहेत, त्याबद्दल आधी माफी मागा. आमचे राजे काय स्त्री लंपट होते का? असा सवाल करीत शिवपुत्र संभाजी राजे यांना स्त्री लंपट आणि दारुड्या म्हणणार्‍यांना आपण आपले आदर्श मानत आहात; त्यांच्याबद्दल आपले काय म्हणणे आहे? हे अजित पवार यांच्यावर टीका करणार्‍यांनी जाहीरपणे सांगावे, असे आव्हान जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad News Today) यांनी दिले.

Jitendra Awhad News
जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाडांचा ट्विटरद्वारे मोठा दावा | Jitendra Awhad Tweet

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि माधव गोळवलकर यांनी संभाजी महाराज हे स्त्रीलंपट आणि व्यसनाधीन होते, असं लिहून ठेवलं आहे. असा दावा जितेंद्र आव्हाडांनी ट्विटरद्वारे केला आहे. तसेच त्यांनी मराठी आणि इंग्रजी भाषेतील पुस्तकांची पानं शेअर केली आहेत. ज्यामध्ये संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिहिलं आहे. सावरकर आणि गोळवलकर यांच्या पुस्तकातील ही पानं असल्याचं आव्हाडांचं म्हणणं आहे. आव्हाडांचं हे ट्वीट सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे.

काय म्हटलं ट्विटमध्ये?

आव्हाडांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “सावरकरांनी आणि माधव गोळवलकरांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काय लिहून ठेवले आहे? ते वाचा… या शूरवीरास बदनाम करण्याचे काम एका वर्गाकडून अनेकवेळा झाले. सावरकर आणि गोळवलकरांच्या दृष्टीने संभाजीराजे हे ‘स्त्रीलंपट’ आणि ‘व्यसनाधीन’ होते. यावर कोणी बोलेल का?” असा सवाल आव्हाडांनी विचारला.

जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने पुस्तकातील मजकूराचे पान ट्विट करत सावरकरांचे संभाजीराजे यांच्याबद्दल काय मत होते हे ट्विट केले आहे.

गेले काही दिवस छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत वापरल्या जाणार्‍या स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर या शब्दांवरुन बरीच वादावादी झालेली आहे. खरंतर निष्कारण हा वाद काढण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म ही संकल्पना महाराष्ट्र धर्म, मराठा धर्म आणि स्वराज्य असे निर्मिलेले होती. मराठा हा व्यापक शब्द होता; मराठा ही व्यापक संकल्पना होती अन् त्यामध्ये सर्व समाविष्ठ झाले होते. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या राज्याला रयतेचे राज्य असे म्हटले गेले होते. या रयतेच्या राज्याचे वारसदार छत्रपती संभाजी राजे हे होते.  त्यामुळे ते कुठल्या एका धर्माच्या रक्षणासाठी बाहेर पडले, असे कोणतेही ऐतिहासिक संदर्भ नाहीत. 

समकालिन जेवढे इतिहासकार आहेत; त्यामध्ये जेवढे परकिय इतिहासकार आहेत; त्या सर्वांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल खूप चांगले लिहून ठेवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन राज्याभिषेक करुन घेतले, असे प्राच्य इतिहासकार प्रा. शरद पाटील यांनी सांगितले आहे. शाक्त म्हणजे काय तर, स्त्रीप्रधान संस्कृतीचा आदर करणे! छत्रपती संभाजी महाराज हे शाक्त परंपरेचे-संस्कृतीचे अभ्यासक होते. त्यामुळे ते स्वराज्य रक्षक होते. या स्वराज्यात आपण सगळेच आलो आहोत. स्वराज्य हे जात-धर्म विरहित होते. ते स्वराज्य रक्षक होते म्हणजेच ते सर्वांचेच रक्षण करायचे ना? कोणत्याही प्राचीन किंवा समकालिन इतिहासकाराने त्यांना धर्मवीर असे कुठेही म्हटलेले नाही. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here