Jitendra Awhad: कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादावर जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट म्हणाले…

0

ठाणे,दि.२३: Jitendra Awhad On Kapil Sibal: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाच्या बाजून ॲड. कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) गेल्या तीन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. गेले दोन दिवस ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी ठाकरे गटाची बाजू मांडली. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेत. युक्तिवादाच्या शेवटी कपिल सिब्बल हे भावनिक झाल्याचंही बघायला मिळालं. दरम्यान, या युक्तिवादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.

जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट | Jitendra Awhad On Kapil Sibal

“आज कपिल सिब्बल जेव्हा सर्वोच्च न्यायालयात एका राजकीय पक्षाची भूमिका मांडत होते, तेव्हा असं वाटत होतं की, भारतीय संघराज्यामधील संसदीय लोकशाही जिवंत रहावी यासाठी ते तळमळीने बाजू लावून धरत आहेत. तेव्हा त्यांचे डोळे पाणावल्यासारखे दिसत होते”, असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले.

कपिल सिब्बल यांची भावनिक टिप्पणी | Kapil Sibal

दरम्यान, अडीच दिवस युक्तिवाद केल्यानंतर कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद संपवला. युक्तिवादाच्या शेवटी कपिल सिब्बल हे भावनिक झाल्याचं बघायला मिळालं. “मी हरेन किंवा जिंकेन. मी इथे फक्त या प्रकरणासाठी उभा नाही. मी इथे आपल्या सगळ्यांच्या हृदयाच्या जवळ असणाऱ्या एका गोष्टीसाठी उभा आहे. संस्थात्मक सार्वभौमत्व आणि राज्यघटनेची जपणूक करण्यासाठी मी इथे उभा आहे. जर न्यायालयानं हा सगळा प्रकार वैध ठरवला, तर आपण १९५० सालापासून जी गोष्ट इतकी काळजीपूर्वक जपून ठेवली आहे, तिचा मृत्यू होईल”, अशी टीप्पणी कपिल सिब्बल यांनी केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here