सोलापूर,दि.8: Jayraj Nagansure News: सामाजिक कार्यकर्ते जयराज नागणसुरे (Jayraj Nagansure) यांनी ACB कडे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) नायब तहसीलदार अजयकुमार गेंगाणे यांची तक्रार केली आहे. जयराज नागणसुरे यांनी यापूर्वी लोकायुक्त व आयकर विभागाकडे तक्रार केली आहे. (Jayraj Nagansure complained to ACB against Naib Tehsildar Ajay Kumar Gengane)
नायब तहसीलदार अजयकुमार गेंगाणे यांची पगारापेक्षा संपत्ती जास्त असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते जयराज नागणसुरे (Jayraj Nagansure) यांनी दिली आहे. सोलापूर शहर उत्तरचे तत्कालीन मंडल अधिकारी अजयकुमार गेंगाणे सध्या हवेली येथे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत.
अजयकुमार गेंगाणे शहर उत्तरचे मंडल अधिकारी असताना अनेक भ्रष्टाचार करून बेहिशोबी मालमत्ता जमा केली आहे, असा आरोप जयराज नागणसुरे (Jayraj Nagansure) यांनी केला आहे. सोलापूर येथे मंडल अधिकारी म्हणून ते चार वर्षे कार्यरत होते. त्यांना महिना 40 हजार पगार धरला तरी वर्षाकाठी त्यांना चार लाख 80 हजार रुपये पगारापोटी मिळत होते. चार वर्षे त्यांनी मंडल अधिकारी म्हणून कार्यरत असताना एकूण त्यांना 19 लाख 20 हजार रुपये पगारातून उत्पन्न मिळाले आहे असे असताना त्यांनी पावणेतीन कोटी रुपयांची मालमत्ता जमा केली आहे. असा गंभीर आरोप जयराज नागणसुरे यांनी केला आहे.
तसेच त्यांची मुलगी युक्रेन मध्ये उच्च शिक्षण घेत आहे. तिला वर्षाकाठी 15 लाख रुपये खर्च आहे. तर सर्वसामान्यांचे मुंड्या मुरगळून सर्वसामान्यांना वेठीस धरून लाच घेऊन असे अधिकारी मोठ्या प्रमाणात बेहिशोबी मालमत्ता गोळा करतात त्यांची चौकशी होत नाही. त्याबाबत सामाजिक कार्यकर्ते जयराज नागणसुरे (Jayraj Nagansure) यांनी लोकायुक्तकडे तक्रार केल्यानंतर अजयकुमार गेंगाणे चौकशी सुरू झाली. त्यानंतर भ्रष्ट मंडल अधिकारी सध्या हवेली येथे नायब तहसीलदार म्हणून असलेले अजय कुमार गेंगाणे यांची आयकर विभागाकडे चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते जयराज नागणसुरे यांनी केली आहे. त्यानंतर ACB कडे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) तक्रार केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीत नायब तहसीलदार अजय कुमार गेंगणे यांनी आजतागयत उचललेला पगार व आज त्यांच्याकडे असलेली मालमत्ता ही त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. लाच लुचपत प्रतिबंधक अधिनियमन 1988 मधील तरतुदीनुसार कलम 13/1 व कलम 13 / 2 अन्वये अपसंपतेचा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जयराज नागणसूरे यांनी केली आहे.
अस्वीकरण: बातमीतील दाव्याच्या सत्येतेची हमी सोलापूर वार्ता घेत नाही.