जयराज नागणसुरे यांची नगर भूमापन अधिकारी किरण कांगणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

कोर्टाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी

0

सोलापूर,दि.13: सामाजिक कार्यकर्ते जयराज नागणसुरे (Jayraj Nagansure) यांनी नगर भूमापन अधिकारी किरण कांगणे (City Land Survey Officer Kiran Kangane) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बोगस कॉम्प्रोमाइज डिक्री (Compromise Decree) करून जागा हडपल्याप्रकरणी नागणसुरे यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे. सोलापूर सिटी सर्वे नंबर 9921/ 1/अ/2 ही जागा बोगस कागदपत्राद्वारे बोगस कॉम्प्रमाईज डिक्री करून हडप केल्याबद्दल संबंधितांवर फौजदारी दाखल करण्याबाबत जयराज नागणसूरे यांनी तक्रार केली आहे. (Solapur News)

काय आहे प्रकरण? | Jayraj Nagansure

Civil अपील नंबर 160/ 2012 च्या कॉम्प्रोमाईज डिक्री करून सिटी सर्वे नंबर 9921/1/अ/ 2 ही जागा खालील लोकांनी हडप केलेली आहे. गंगाबाई शंकर मळगे, नागनाथ शंकर मळगे, श्रीदेवी पुजारी, अंबुबाई सिद्धप्पा मळगे, राजकुमार सिद्धपा मळगे, इरण्णा शेंडगे, सखुबाई मळगे, उमा वाघमोडे, अंबुबाई थावरे, रेणुका कोळेकर चन्नम्माबाई आडोळी, भारती जोगदंड, रामराव जोगदंड, नितीन जोगदंड, मीनाक्षी जगताप या सर्वांनी संगणमत करून सोलापूर कोर्टातील जिल्हा न्यायाधीश दोन पवटवाडकर यांच्या कोर्टात रजिस्टर civil अपील नंबर 160/ 2012 हा बोगस बेकायदेशीर कॉम्प्रोमाईज डिक्रि सादर करून कोर्टाची फसवणूक केली असे नागणसूरे यांनी सांगितले.

गुन्हा दाखल करण्याची मागणी | Solapur News

सर्वांनी फसवणूक करून शामला नागेश संघा यांची सिटी सर्वे नंबर 99 21/ 1/ अ / 2 ही जागा हडप केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते जयराज नागणसूरे यांनी ही कॉम्प्रोमाइज डिक्री बोगस व खोटी आहे याची सर्व पुरावे सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूरचे पोलीस आयुक्त आणि जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सोलापूर हेमंत सानप यांच्याकडे सादर करुन वरील प्रकरणाची चौकशी करून कोर्टाची फसवणूक करून बोगस सातबारा नोंद प्रकरणी वरील 15 जणांवर आणि नगर भूमापन अधिकारी सोलापूर किरण कांगणे यांनी वरील 15 जणांशी संगनमत करून आर्थिक व्यवहार करून शामला नागेश संघा यांचे नाव शेती सर्व रेकॉर्ड मधून कोणतीही नोटीस न देता त्यांचे म्हणणे न ऐकता नाव कमी केल्याप्रकरणी कलम 34 कलम 418, 420, 427, 467 व 468 कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची तक्रार दाखल केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here