जयंत पाटील यांनी सांगितले राष्ट्रवादी पक्ष का फुटला

0

मुंबई,दि.१२: राष्ट्रवादी पक्ष का फुटला याचे कारण जयंत पाटील यांनी सांगितले आहे. अजित पवार यांनी बंड करत राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह मिळवले. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गट व शरद पवार गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची फैरी झडत आहेत. राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आम्ही वेगळी भूमिका घेतल्यानंतर शरद पवार हे भाजपसोबत येण्यास ५० टक्के तयार होते, असा दावा केला.

मंत्री छगन भुजबळ यांनीही २०१४ सालीच शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप केला. या आरोपांना आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

शरद पवार यांनी विचारसरणी सोडण्यास नकार दिला

प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळांवर पलटवार करताना जयंत पाटील म्हणाले की, “काही नेते भाजपसोबत जाण्यासाठी शरद पवार यांना विनंती करत होते. मात्र पवारसाहेब भाजपसोबत जाण्यास तयार नव्हते, हीच तर त्या नेत्यांची अडचण होती. ते तयार असते तर भाजपसोबत गेलेच असते. शरद पवार यांनी विचारसरणी सोडण्यास नकार दिला. त्यामुळे आमचा पक्ष फुटला, पण काहीही किंमत मोजावी लागली तरी विचारसरणी सोडायची नाही, हे पवारसाहेबांनी ठरवलं होतं,” असं पाटील यांनी म्हटलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here