पुणे,दि.२४: जयंत पाटील यांनी लोकसभेसाठी बारामतीतून कुणाला मिळणार उमेदवारी हे सांगितले आहे. अजित पवारांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवार यांच्या राजकीय भूमिकेनंतर बारामती लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. इथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जयंत पाटील यांनी सांगितले लोकसभेसाठी बारामतीतून कुणाला मिळणार उमेदवारी
शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरही जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संसदेचं अधिवेशन असताना अनेक खासदार एकत्र भेटतात. फोटो काढण्याचा मोह त्यांना आवरला नसेल म्हणून काढला असेल. उद्यागपती अदानी यांनी नवा उद्योग सुरू केला आहे. त्यांच्या उद्घाटनाला पवार गेले यात गैर काय आहे. तो प्रकल्प काही आपल्या राज्यातून गेलेला नाही. त्यांना नवा प्रकल्प साहेबाना दाखवायचा असेल. पवारसाहेब इंडिया आघाडीमध्ये सध्या आहेत. त्यात काही शंका घेऊ नये, असं जयंत पाटील म्हणालेत.
भावी मुख्यमंत्री म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे बॅनर लागले आहेत. त्यावर तुम्हाला काही ऑब्जेक्शन आहे का? आम्ही ठरवू… लोकशाहीत पोस्टर कुणीही लावू शकतं. समर्थक कुणाला कुठंही नेऊन बसवतं. पवारसाहेबांकडे जे नेते आहेत. त्यांच्याकडे मुख्यमंत्री व्हावं असे अनेक नेते आहेत. अनेकांचे फ्लेक्स लागतात, असं जयंत पाटील म्हणालेत.