“तुम्ही शरद पवार यांना घट्ट पकडून रहा, इकडे परत येण्य़ासाठी पुन्हा…” गिरीश महाजन

0

मुंबई,दि.२४: भाजपा नेते मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली आहे. एकीकडे शिंदे सेनेच्या पात्र-अपात्रतेवर हालचाली सुरु झालेल्या असताना आता राष्ट्रवादीतही हालचाली घडत आहेत. यामुळे एकनाथ खडसे यांनी आमची काळजी करू नये. त्यांचे राष्ट्रवादी बचे कूचे जे लोक आहेत ते सुद्धा आता आमच्याकडे येत आहेत, असा संदेश भाजपा नेते गिरीष महाजन यांनी दिला आहे. 

मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचा जो हेतू आहे त्यानुसार काम करावं, मात्र सरकारने आता शिंदे आयोग नेमला आहे, त्यांचे दररोज काम सुरू आहे. आता पुन्हा बैठक होत आहे, आणि जरांगे पाटील यांनी त्या बैठकीला आमंत्रित करण्यात आले. लवकर यावर सन्माननीय तोडगा हा निघेल, असे महाजन म्हणाले. 

संजय राऊत यांचे डोके तपासले पाहिजे. कुठे संजय राऊत, कुठे मोदी आणि कुठे संसद भवन. जगातली सर्वात मोठी वास्तू म्हणजे संसद भवन आहे. मात्र संजय राऊत यांचे मूर्खपणाचे प्रश्न आहेत. त्यांच्याकडून दुसरी काही अपेक्षा नाही. चंद्रावर गेले तरी चंद्रावर का गेले सूर्यावर का गेले नाहीत असे त्यांचे मूर्खपणाचे प्रश्न असतात. संजय राऊत यांच्या जिभेला हाड नाही, आम्ही त्यांना फार गांभीर्याने घेत नाही, अशी टीका महाजन यांनी केली. 

तुम्ही शरद पवार यांना घट्ट पकडून रहा

एकनाथ खडसे यांनी आमची काळजी करू नये. तुम्ही शरद पवार यांना घट्ट पकडून रहा. इकडे परत येण्य़ासाठी पुन्हा विनवण्या तसेच हातपाय जोडू नका. अजित दादा यांच्याबरोबर येण्यासाठी तुम्ही काय करत आहात, याची कल्पना आम्हाला तसेच अजित पवार यांना सुद्धा आहे. आमच्याकडे येण्यासाठी प्रयत्न करू नका, असा सल्ला महाजन यांनी दिला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here